पंचमवेद आयुर्वेद
आयुरसमीन विद्यतेsनेन वा आयुर्विनदतीत्ययुर्वेद ||अ.१.२३||
आयुष्याच्या हिताचा विचार ज्यामध्ये केल्या जातो तसेच दिर्घ आयुष्याविषयी उपदेश ज्यात आहे त्यालाच आयुर्वेद म्हणतात.
हे मुला ! आयुर्वेदाचे दोन प्रमुख उद्देश आहेत. रोगाने त्रासलेलया रोगापासून मुक्ती व रोगमुक्त असणाऱ्या लोकांच्या आरोग्याचे रक्षण.
वत्स सुश्रुत ! इह खलवायुर्वेदप्रयोजनम् व्या ध्यूपसृष्टानाम् व्याधिपरिमोक्ष: स्वस्थस्य रक्षनकनच्य ||सु.स.अ.१.२२||
आयुर्वेद म्हणजे ज्यात आरोग्याच्या हित व अहित याचा विचार केला जातो व ज्याच्या उपदेशाने दीर्घायु प्राप्त होते त्याला आयुर्वेद म्हणतात.
आयुरस्मिन विददयतेs नेन वा आयुर्विनदतीत्यायुर्वेद || सु.स अ.१.२३||
ब्रम्हा प्रोवाच तत: प्रजापतिरधीजगे, तसमदशवीनौ, आशवीभयामिंद्र:, इंद्रादहम्, मया तविह प्रदेयमरथिभ्य: प्रजाहितहेतो: || सु.स अ.१.२८||
या आयुर्वेदाला सर्वप्रथम ब्रम्हदेवाने सांगितले. ब्रम्हाकडून दक प्रजापतीला यचे ज्ञान प्राप्त झाले. दक्ष प्रजापतिकडून ते अश्विनीकुमाराना प्राप्त झाले. त्यांच्या कडून मग इंद्राने त्याचा अभ्यास केला.
अहं हि धंवतरीरादिदेवो जरारुजा मृत्युहरोsमरणाम् | शल्याङ्ग्मंगाइरूप रईररूपेतं प्रापतोसमि गाम भूय इहो प डेशतूम || सु.स अ.१.२९||
देवाना वृद्धावस्था, रोग, व मृत्यूपासून अबाधित ठेवणारा आदिदेव धन्वतरि आयुर्वेदासह इतर शल्यचिकित्सा समजाऊन सांगण्याकरीत पुन्हा पृथ्वीवर आलो आहे.
प्रागभिहित्म् संविशमध्यायशतम् पंचयसु स्थानेशु | तत्र सूत्रस्थानमध्याया: षटचतवारिणशत, षोडश निदानानि, दश शारीराणि, चतवारिणशनचिकितसितानी, अक्षतोऊ कल्पा:, तदुत्तरम् शट्षष्ठी: || सु.स अ.३.३||
प्राचीन भारतातील वेदवाङमय हे जगातील सर्वात जुने साहीत्य आहे. आयुर्वेद, काहींच्या मते अथर्ववेदाचा भाग आहे; तर काहींच्या मते ऋग्वेदाचे उपांग आहे. यापैकी, तर्कसुसंगत ऋग्वेदाचे उपांग वाटते. ऋग्वेद हे सर्व वेदांमध्ये प्रथम रचल्या गेलेत. आयुर्वेदाची प्रथम व प्रधान देवता धन्वंतरी आहे. आतापर्यंतच्या संशोधनानुसार वेद वाङमय हे साधारणत: इसवी सनापूर्वी ५००० वर्षे मानल्या जातो. नुकत्याच जाहीर झालेल्या एका संशोधनानुसार द्वारकेच्या समुद्रात मिळालेल्या अवशेषांचे व नवीन कार्बन डेटिंग ३२००० वर्षे आहे; आणि हे जर खरे असेल तर महाभारताचा काळ त्या आधीचा. महाभारतात भगवदगीतेचा काळ आहे. गीता हे वेद व उपनिषदाचे सार आहे, म्हणजे वेदाचा काळ सध्याच्या समजुतीपेक्षा मागे जाईल.
आयुर्वेद हे ऋग्वेदाचे उपांग आहेच, म्हणजे आयुर्वेद हा देखील ३२००० वर्षे इतकाच जुना झाला. असो. आयुर्वेदाने सर्व प्रथम रोगाची व्याख्या केली आहे. ती अशी,
तद्दु:ख संयोगा व्याधय व ऊच्चते ||अ.१.३१||
ज्याच्या संपर्कामुळे मनुष्याला दु:ख होते त्याला रोग म्हणतात.
ते चतुर्विधा: आगंतव:, शारीरा, मानसा:, स्वाभाविकाशचेती || सु.स अ.१.३२||
व्याधी म्हणजे रोग चार प्रकारचे असतात. अचानक निर्माण झालेले, शारीरिक, मानसिक आणि स्वाभाविक.
भारतीय आयुर्वेद शास्त्रात प्रामुख्याने तीन महर्षिणचा उल्लकह सापडतो. महर्षि चरक, महर्षि सुश्रुत आणि महर्षि वागभट. चरकसंहिता, सुश्रुत संहिता व अष्टांग हृदय हे तीन ग्रंथ साधारणत: २००० वर्षांपूर्वी संस्कृतमध्ये लिहिलेले आहेत.
ते श्वागंतोsभिघानिमितता| शारीरास्तवननपानमूलावातपित्तकफशोणीतसन्निपातवैषम्यनिमित्ता |मानसास्तु क्रोधशोकभयहर्षविषादेर्ष्याsभ्यसूयादैन्यमात्सऱ्य्यकामलोभप्रभ्रुतय ईछ्याद्वेषभेदाइरभवंति | स्वाभाविकास्तुक्षुतपिपासाजरामृत्यूनिद्राप्रक्रूतय:|| सु.स अ.१.३३||
धन्वंतरी:
धन्वंतरी हे वेदकाळाच्याही आधीचे, म्हणजे देवांचे वैद्य. तेव्हा तर जगत मानव वस्तीही नव्हती.
सुश्रुत:
महर्षि सुश्रुत हे इसवीसनापूर्वी सहाव्या किंवा सातव्या शतकात होऊन गेले. त्यांना भारतीय आरोग्यशास्त्राचे जनक असे म्हणता येईल. त्यांनी प्लॅस्टिक सर्जरी ही सांगितलेले आहे. आधुनिक आरोग्यशास्त्राचा जनक समजला जाणार ग्रीक शास्त्रज्ञ हिप्पोक्रेटस (इसवीसनापूर्वी ४६० ते ३७९) याचा जन्म होण्याच्या खूप आधी (इसवी सनापूर्वी सातव्या शतकापूर्वी) महर्षि सुश्रुत होऊन गेले.
चरक:
महर्षि चरक हे इसवीसनापूर्वी १०० ते इसवी सन २०० या काळात होऊन गेले. आयुर्वेदातील त्रयमूर्ती पैकी ते एक होत. ते काश्मीरमध्ये होरऊन गेले. चरक संहिता हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. भारतीय आरोग्य शास्त्रावरील एक महत्वाचा ग्रंथ म्हणून त्याकडे पहिल्या जाते. चरक संहितेत एकूण ८४१९ श्लोक आहेत. त्याचे विवरण खालील प्रमाणे आहे.
अ.क्र. | स्थान | एकूण प्रकरणे | एकूण श्लोक | एकूण गद्य | |
१ | सूत्रस्थान | ३० | १६७० | २८३ | |
२ | निदानस्थान | ०८ | १०३ | १४६ | |
३ | विमनस्थान | ०८ | ८८ | २६७ | |
४ | शरीरस्थान | ०८ | २३६ | १८३ | |
५ | इंद्रियस्थान | १२ | ३८१ | ३८ | |
६ | चिकित्सा स्थान | ३० | ४९६१ | १४२ | |
७ | कल्पस्थान | १२ | ३३० | ४८ | |
८ | सिद्धीस्थान | १२ | ६४९ | ५२ | |
एकूण | १२० | ८४१९ | ११११ |
चरकानी मानवी शरीरात एकूण वीस प्रकारच्या कृमि असलयाचे म्हटले आहे. यशस्वी ओरषधोपचार चार गोष्टीव्र अवलंबून आहे. वैद्य, औषध, रोगी आणि परीचारक. याशिवाय औषधोपचार व्यवस्थित होण्याकरिता त्या प्रत्येकाच्या अंगी चार गुण असणे आवश्यक आहे. मानवी शरीरावर व मनावर आहाराचा परिणाम होत असल्याचे चरकानी म्हटले आहे. त्यांच्या प्रमाणे, रसायन चिकित्सा बुद्धिमत्ता, स्मृति, इच्छाशक्ति, शारीरिक ताकद, आवाजातील गोडवा आणि पत्यक्ष शक्ति वाढविते. त्यामुळे, रक्त, मांस, शुक्र यांची वाढ होते. याचा चांगला परिणाम म्हणून जून आजार थांबतात.
चरकानी मानवी शरीररचना शास्त्रही लिहिले आहे. त्यांच्या मते, शरीरत एकूण ३६० अस्थि आहेत, ज्यामध्ये, दात, दाताचे मूळ यांचा समावेश होतो. आश्चयऱ्या म्हणजे चरकांच्या म्हणण्यानुसार मद्य योग्य वेळी, योग्य पद्धतीने, योग्य प्रमाणात अन्नासह, प्राशन केले तर त्याचा उपयोग अमृतसारख होऊ शकतो. त्यांनी, विषारी वनस्पति आणि प्राणी यनहके पण वर्णन करतात व त्याच बरोबर त्यावर २४ प्रकारचे औषधोपचारही सांगतात. त्यांनी एकूण पाच प्रकारच्या वातदोषबद्दल लिहिले आहे. ते म्हणजे, प्राणवायू, उदानवायु, अपानवायु, समानवायु, व्यानवायु. त्यांनी हिप्पोक्रेटिक शपथेचे कितीतरी आधी वैद्याच्या (Doctor) नैतिकते बाबत लिहिली आहे.
वागभट:
वागभट याचा काळ हा इसवी सना पूर्वी २०० वर्षे असा आहे. वागभटणी आपल्या ग्रंथात पूर्वीच्या ग्रंथांची दखल घेतात. वात, पित्त व कफ याविषयी त्यांचे विचार अत्यंत स्पष्ट आहेत. मांसाहर पथ्य आहे असे वागभटणी म्हटले आहे. त्यांनी आपल्या ग्रंथात रसांचे वर्णन केले आहे. मानसिक व्यथेस त्यांनी महत्व दिलेले आहे. बौद्ध तत्वज्ञानातील सार्वत्रिक प्रीती हा सिद्धांत वागभटस मान्य होता. सुरापान औषधाकृत करावे वागभट म्हणतात. वागभटांनी लिहिलेल्या अष्टांग हृदय ह्या महान ग्रंथात एकूण सहा (६) खंड आहेत.
१) सूत्रस्थान
२) शरीरस्थान
३) निदानस्थान
४) चिकित्सा स्थान
५) कल्पस्थान
६) उत्तरस्थान
ह्या सहा खंडामध्ये एकूण १२० अध्याय आहेत व ७१२० श्लोक आहेत.
एकंदरीत आरोग्य शास्त्राचा इतिहास समजाऊन घेण्याकरिता वेद, सांस्कृतिक इतिहास व बौद्ध वाङमय यांचा अभ्यास करावा लागेल. असो.
आगंतुक रोग हे शस्त्र, काठी, पाषाण यांच्या आघाताने उत्पन्न होतात. शारीरिक रोग वाईट, चुकीचे किंवा अति जेवण केल्यामुळे होते. तसेच, कफ, पित्त व वातामध्ये विषमता निर्माण झालयानेही होतात. मानसिक रोग, क्रोध, शोक, भिती, आनंद, दु:ख, असूया, वैफल्य, मत्सर, कामवासना, लोभीपणा व इच्छा आणि द्वेष यांच्यामुळे निर्माण होतात. स्वाभाविक रोग, भूक, तहान, वृद्धवस्था, जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू आणि झोपेच्या अभावामुळे निर्माण होतात.
प्राणिनाम् पुनर्मुल माहारो बलवऱ्नौजसानच्य, स षटसुरसेषवायतत:, रसा: पुनर्द्रव्याश्रया:, द्रव्याणी पुन:रोषधय: | तास्तु द्विविधा: स्थावरा जंगमाश्च
|| सु.स अ.१. ३६||
मनुष्याच्या जीवनाची सुरक्षा त्याच्या मूलत: आहारावर अवलंबून आहे. शरीरातील बल, तेज, ओज व त्याची वाढ ही देखील आहारावरच अवलंबून आहेत. आहार हा षड्रसात्मक असावा. औषधला आयुर्वेदामध्ये द्रव्य असे म्हणतात.
तासाम् स्थावराशच्यतुर्विधा: वनस्पतयो, वृक्षा, विरुध ओषधय इति | तासु अपुष्पा फलवंतो वनस्पतय: | पुष्पफलवंतो वृक्षा: | प्रतानवत्य: सतंबिनयशच्या वीरुध:| फलपाकनिष्ठा ओषधय ईति ||अ.१.३७||
यात औषषधांचे चार प्रकार केले आहेत. वनस्पति, वृक्ष, वीरुध आणि औषधी. ज्याला फळ येतात पण फुले येत नाहीत, त्यांना वनस्पति असे म्हणतात. ज्याला फुले आणि फळे दोन्हीही येतात त्यास वृक्ष म्हणतात. ज्या पसरतात त्यांना वीरुध म्हणतात; आणि जे फक्त फळे पिकण्या पर्यंतच जीवंत राहतात त्यांना औषधी असे म्हणतात.
महर्षि सुश्रूतानी सुश्रुत संहितेत पहिल्याच अध्यायात असे म्हटले आहे,
“इहखलवायुर्वेदअष्टांगममुपाङ्गमर्थवेदस्यानुत्पादइयाव प्रजा: श्लोकशतसहस्त्रमध्यायसहस्त्रशचय कृतवान स्वयंभू:| ततोsअल्पायुषटवमल्पमेधस्तवच्यालोक्य नराणां
भूयोsषटधा प्रणीतवान || सु.स अ.१.६||”
आयुर्वेद अथर्ववेदाचे उपांग आहे आणि त्याचे आठ भाग आहेत. पूर्वीच्या काळी ब्रह्मदेवाने सृष्टिरचनेच्या आधी आयुर्वेद एक लक्ष एक हजार श्लोकांचा तयार केला होता, परंतु मनुष्य अल्पजीवी व स्वल्प बुद्धीचा आहे हे लक्षात घेऊन, नंतर आयुर्वेदला आठ भगत विभाजित करण्यात आले. ते आठ भाग खालील प्रमाणे आहेत.
तथद्या शल्यम, शालाक्याम, कायचिकीतसा, भूतविद्या, कौमारभ्रुत्यम्, अगदतंत्रम, रसायनतंत्रम, वाजीकरणतंत्रमिती || सु.स अ.१.७||
शल्य, शालाक्य, कायचिकित्सा, भूतविद्या, कौमारभ्रुत्य, अगदतंत्र, रसायनतंत्र, आणि वाजीकरण हे ते आठ भाग आहेत.
ह्या आठ अंगाची थोडक्यात लक्षणे अशी आहेत.
तत्र शल्यम् नाम विविधतृणकाष्ठपाषाणपानशूलोशताषटास्थिबालनखपूयास्त्रावदुष्ट व्रणाणतरर्गर्भ शलयोद्धरणार्थ, यंत्रशस्त्र क्षारागणिप्र प्रनिधानव्रण विनिषयच्यायार्थसच्य ||अ.१.९||
शल्यतंत्र म्हणजे, अनेक प्रकारचे गवत, काष्ठ, दगड, धूळकण, लोखंड, माती, हाडे, केस, नखे, पू, स्त्राव, क्षार अग्निकर्म करण्याचे ज्ञान, तसेच व्रनाची परीक्षा, हे सर्व शल्यतंत्रात समाविष्ट आहे.
कायाचिकित्सा नाम सर्वांगसंशरीतानाम व्याधीनाम
ज्वररक्तपित्तशोशो उन्मादापस्मारकुष्ठमेहातिसारदीनामुपशमनार्थम् || सु.स अ.१.११||
काया चिकित्सा म्हणजे ज्वर, रक्तपित्त, शोष, उन्माद, अपस्मार, कुष्ठ, प्रमेह, अतिसार, आदि रोगांवर उपचार करण्याचे शस्त्र होय.
भूतविद्या नाम देवासुरगंधर्वयक्षरक्ष:पितृपिशाच्चनागग्रहा ददयूपसृष्टचेतसाम, शांतिकर्मबलिहरणादिग्रहोपशमनार्थ || सु.स अ.१.१२||
आयुर्वेदाच्या ह्या भागात, देव, दैत्य, यक्ष, राक्षस, पितर, पिशाच्च, नाग आदि ग्राहामुळे ज्यांच्या मनावर परिणाम झालेला आहे त्यांच्याकरिता शांतिपाठ, बलिप्रदान, हवन इत्यादि ग्रहदोष शामक कार्याचे वर्णन या भागात आहे यालाच भूतविद्या असे म्हटलेले आहे.
कौमार्यभ्रुत्य नाम कुमारभरणधात्रीक्षीरदोषसंशोधनार्थ दुष्टस्तन्यग्रह समुतथायानांशचय व्याधीनाममुपशमनार्थम् || सु.स अ.१.१३||
कौमारभ्रुत्य भागात, मुलांचे पोषण, आईच्या दुधातील दोष, दूषित दुग्धपान, आणि ग्रहामुळे निर्माण होणाऱ्या रोगांचे निदान यांचा समावेश होतो.
अगदतंत्र नाम सर्पकीटलूतामूशीका दिदषटविषव्यंजनार्थ विविधविषयसंयोगोपशमनार्थ च || सु.स अ.१.१४||
सर्प, किडे, मकडी, उंदीर यांच्या दंशाने उत्पन्न विश लक्षणांना ओळखून त्यावर व त्यासारखे इतर स्वाभाविक, कृत्रिम आणि इतर प्रकारच्या विषबाधेवर उपाय करून त्यांचे शमन करणे याला अगदतंत्र असे म्हणतात.
तत्र, मन:शरीराबाधकराणि शल्यानि, तेशामाहरणोपायो यंत्राणि || सु.स अ.७.४||
मन व शरीराच्या वेदनेला शल्य म्हणतात व अशा शल्यास नष्ट करणाऱ्या साधनाना यंत्र म्हणतात.
पूर्वीच्या काळी सुद्धा Laryngoscope, Phonoscope, Orthoscopy, Cystoscope, Auroscope, Proctoscope, Sigmoidoscope, Vaginal speculum, Rectal speculum, Nasal Speculum अशी यंत्रे होती.
विनशाती: शस्त्राणी तद्याथा मंडलाग्रक्ररपत्रवृद्धीपत्रनखशस्त्रमुद्रि कोतपलपत्रकाऱ्द्धधारसूचीकुशपत्राटीमुखशरारिमुखांतरमुखत्रिकुरचककुठारिकाव्रीहीमुखारावेतसपत्रकबडिशदन्तशनगकवेशण्य इति || सु.स अ.८.३||
शल्य चिकीतसेकरीता ज्यांचा उपयोग केल्या जातो अशा एकूण २० उपकरणांचा उल्लेख वरील श्लोकात आहे. मंडलाग्र (Circular Knife ऑर Round Head knife, Decapitating knife), करपत्र (Bone Saw), वृद्धीपत्र (Scalpel or Dissecting knife or Curved Bistoury), नखशस्त्र (Nail parer), मुद्रिका (Finger knife), उतपलपत्र (Lancet), अर्धधार (Single Edged Knife),
सूची (Needle -Straight-सरल, Half Curved-वक्रमुख,
Fully Curved-धनुर्वक्र), कुशपत्र (Paget’s knife or Bistoury), आटीमुख (चक्रवर्तीमते-Hawk bill Scissors, सामान्य: हे lancet आहे.), शरारीमुख (Pair of Scissors), अंतर्मुख (Curved Bistoury), त्रिकूरचक (Trocar or Brush), कुठरिका (कुठारसदत्र Axe shaped knife), व्रीहीमुख (Trocar), आरा (Awl), वेतपत्र (Narrow clad knife or Scalpel), बडिश (Hook), दंतशंक (Tooth scatter), एषणी (Sharp probe, probe director).
सर्वशरीराबाधकरं शल्यम्, तदिहोपदिश्यत इत्यत: शल्यशास्त्रं || सु.स अ.२६.४||
सर्व शरीरात जे दु:ख व पीडा निर्माण करते त्यास शल्य म्हणतात व ते शल्य काढण्याला शल्यशास्त्र म्हणतात.
औषधीशास्त्र:
चरक संहितेत रसायनापासून मनुषयास,
दीर्घमायु: स्मृतीं मेधामारोग्याम तरुणम् वय: |
प्रभावर्नस्वरौदार्यम् देहेनदरीयबलं परम् |
वाकसिद्धिम प्रणति कांतीम् लभते ना रसायनात ||
दीर्घ आयुष्य, स्मृति मेघा, आरोग्य, तारुण्य, प्रभा, वर्ण, उत्तम स्वर, स्वभावाची उदारता, इंद्रियसामर्थ्य, वाकसिद्धी, नम्रता व कांती प्राप्त होतात. ह्या सर्वास मिळून “कायसंपत” असे नाव योगशास्त्रात दिलेले आहे. अशा प्रकारची कायसंपत प्राप्त करून देणारे अनेक औषधी-प्रयोग सांगितल्यावर शेवटी ते हयाप्रमाणे सांगतात,
सत्यवादीनमक्रोधम् निवृतम् मद्यमैथुनत |
अहिंसम्, प्रशांतम्, जपशौचपरम्, धीरम्, तपस्विनम् |
देव-गोब्राम्हणचार्य-गुरुवृद्धारचनरतम्,
आनृशनस्यपरं |
अनहंकृतम, शास्त्राचारम, अध्यात्मप्रवनेणदरीयम् |
धर्मशास्त्रवरं, विडद्याननर्म नित्यरसायनं ||
नेहमी खरे बोलणारा, क्रोधवश न होणारा, मद्यापासून निवृत्त, ब्रम्हचर्यव्रत पाळणारा, अहिंसक, शांतवृत्तीचा, जपशौचादिकात तत्पर असलेला, धैर्यवान, तपस्वी, देव-गायी-ब्राम्हण-आचार्य गुरुजन आणि वृद्धाना मान देणारा, कोणाचा घातपात न करणारा, निरभिमानी, सदाचरणी, अध्यात्माकडे इंद्रियाचि ओढ असलेला. धर्मशास्त्रपरायण असा जो मनुष्य तो पूर्तिमंत नित्यरसायन होय. सुश्रुत संहितेत “विडंग-तंदुलयोग” नावाच्या रसायनाचे फळ सांगताना हे रसायन घेणार मनुष्य रजस्तमोगुणांपासून मुक्त होऊन सत्वगुणाचा आश्रय करतो, त्याच्या ठिकाणी प्रशस्त असलेला जो सत्वगुण त्याची सर्व लक्षणे प्रकट होतात, त्याला फार दूरचे ऐकू येते व दिसू लागते, त्याच्या ठिकाणी हत्तीचे बळ आणि घोड्याचा वेग उत्पन्न होऊन तो पुन: तरुण होतो असे सांगितले आहे. [पातंजल उयोगसुत्रे: विभूतिपाद-सूत्रे-४४).
मुळवनस्पति हे आयुर्वेदाचे हृदय आहे. फुले, मुळे, खोड, पाने यांचा उपयोग औषधी तयार करण्याकरिता केल्या जातो. आयुर्वेदात एकूण १५,००० औषधीगुणयुक्त वनस्पती सांगितलेली आहेत; त्यापैकी ९०० सर्वसामान्यपणे वापरात आहेत. शरीराचे नैसर्गिक रोग प्रतिकारक शक्ति जोपासण्याकरिता, निबाचा उपयोग सर्वात जास्त होतो. परंपरागत औषधीमध्ये, आद्रक, आवळा, अश्वगंधा, हळद, हे देखील औषधीकरिता खूप महत्वाचे आहे.
सुश्रुत संहिता हा आयुर्वेदावरील अत्यंत महत्वाचा ग्रंथ मानला जातो. त्याची सुरुवात सूत्रस्थानाने होते, ज्यामध्ये सर्वसामान्य आरोग्य विषयी सर्वसामान्य प्रश्नाचे विवेचन केलेले आहे. महर्षि सुश्रुत यांना देवांचे वैद्य (Doctor) धन्वंतरी यांचा अवतार मानतात. निदानस्थानामध्ये रोगनिदान याचा विचार केलेल्या आहे. शरीरस्थान यामध्ये शरीर रचनाशास्त्र याचा ऊहापोह आहे. चिकित्सास्थान थेरपीचा विचार करते, ज्यात रसायन व वाजीकरण आहे. कल्पस्थान विषाविषयी (Toxicology) वर्णन आहे. उत्तरस्थानामध्ये, ऊर्ध्वाङ्ग म्हणजे शरीराचे वरील भाग (कमरेच्या वरील, पोट, छाती, घसा, तोंड, नाक, डोळे, मेंदू हे सर्व.) याला पूरक असे, बालग्रह, कायाचिकित्सा, आणि भूतविद्या आहेत. महर्षि सुश्रुत हे प्रामुख्याने शल्यचिकित्सा, जसे, कर्णपाळी संधान, नाससंधान, ओष्ठ्यसंधान, वरणोपक्रम, अस्थिभंगआणि संधिभग्न, शिरवेध. त्याचबरोबर, विविध रोगांवर उपायही सुचविले आहेत. सुश्रुत संहितेवर, चंद्रदत्ताचा भानुमती (११वे शतक), आणि दलहन यांचे निबंधसंग्रह (१२ वे शतक) यांनी लिहिलेले ग्रंथ आज उपलब्ध आहेत. [ Paliwal Murlidhar et al/IJRAP 391), Jan-Feb 2012].
चरक संहिता वैदयाना (Doctors) तर्कशास्त्राचे मूलभूत सिद्धांत शिकविते ज्यामुळे रोगनिदान व त्यावर उपाय योजना निरीक्षण व तर्काच्या आधारे करता येईल. भूतविद्या हा भाग अथर्व वेदातून आलेला आहे. आयुर्वेद ही त्रिदोष पद्धती आहे, कफ, पित्त व वात. शरीरातील या तिन्ही दोशांचा रासायनिक समतोल म्हणजेच आरोग्य. याचाच अर्थ असा की, या तीन दोषांमध्ये असमतोल निर्माण झाला की त्यास व्याधी किंवा रोग म्हणतात या असंतोलाने शरीरातील सप्त धातूनवर विपरीत परिणाम होतो. आयुर्वेद वैद्ययास वास्तववादी विचारांचा आधार घेण्याकरिता उद्युक्त करते. वैद्ययाने, रोग्याची परीक्षा करताना फक्त त्याच्या रोगाचे परीक्षा न करता, रोग्याचे शरीरविज्ञान, मानसिकस्थिति, वय, आहारच्या सवयी, रोग झाला तो ऋतु वगैरे गोष्टींचा विचार करणे आपक्षित आहे. आजच्या डॉक्टर प्रमाणेच त्यावेळी वैद्य त्यावेळी प्रत्यक्ष निरीक्षण व अनुमानाच्या आधारे रोगनिदान व उपाय योजना करीत असत. वैद्ययाने रोगयास प्रश्न विचारणे अपेक्षित होते. वैद्ययाने त्याच्या पंचेंद्रियांचा उपयोग रोग निदाना करिता करणे महत्वाचे समजले जात होते. आयुर्वेदामध्ये शरीरशुद्धी व रोगनिवारण अशा दोनही बाबीकडे लक्ष दिलेले होते. बाह्य व अंतर्गत शरीरशुद्धी करिता पंचकरमाचा उपयोग करावा असे सांगितलेले आहे.
त्याहीवेळी, वैद्यकीय व्यवसायाकरिता राज्य शासनाकडून परवानगी घेणे (License) बंधनकारक होते. चुकीची औषधीयोजना (Medical Treatment) केल्यास त्या वैद्ययास दंड होत असे. वैद्य असण्याचे ढोंग करणाऱ्यास कठोर शिक्षेची तरतूद केलेली होती.
वैद्य कसं असावा याचे वर्णन सुश्रुत संहितेत आढळते. वैद्य, निश्चयी, धैर्यवान, उत्तम स्मृति असलेला, चांगली वाणी असलेला, आणि शांत स्वभावाचा असावा. महर्षि चरकाने देखिल या गोष्टींचा पाठपुरावा केलेल्या आहे. त्यांच्या मताप्रमाणे, वैद्य हा सदृढ, विनम्र, सत्यवादी, कौशल्यपूर्ण, आणि निर्भय असावा. त्याचे हात स्थिर व संयमित असावे, मन शिस्तबद्ध असावे, आणि त्याने स्वत:च्या प्रौढी मिरऊ नये. तो लोकाना आरोग्य व रोगणविषयी समजाऊन सांगू शकला पाहिजे, तसेच तो सर्वसामान्य लोक व विद्वान लोकांशी संवाद साधू शकला पाहिजे; व याकरिता त्याचकडे बुद्धिमत्ता व संभाषण कौशल्य असाव्याला हवे. याकरिता, वैद्ययाने, तत्वज्ञाविषयी अभ्यासू असावयाला हवे, व्यावसायिक चर्चासत्रामध्ये भाग घ्यायला पाहिजे. तसेच त्याने लोकसंवादमध्ये निष्णात व्हायला पाहिजे. चरकाने औरषधोपचारा करिता प्राधान्य कसे ठरवावे याचे संकेतही (Triage) दिलेले आहेत.
आयुर्वेदाच्या मुळाशी भारतीय तत्वज्ञानाची पार्श्वभूमी आहे, वैषशिक आणि तर्कशासत्राशी संबंधित न्याय. आयुर्वेदाचा संबंध सांख्य तत्वज्ञानाशी सुद्धा आहे. रोगनिवारण औषधोपचाराकरिता रोग्याच्या नैदानिक रसायनस्थितिचे ज्ञान करून घेण्याकरिता वैद्ययाने उपयोगात आणावयाच्या “प्रतिबोध व अर्थापतती” ह्या वैशेशीक तत्वज्ञाच उपयोग करावा. रोग्याच्या स्थितीचा अभ्यास करण्याकरिता, ‘न्याय्य’ पद्धतीच्या आधाराने रोग्याच्या परिस्थितीचे ज्ञान करून घेऊन, व रोगाची सद्दय स्थिति माहीत करून घेऊनच औषॉधोपचार सुरू करावा. महर्षि चरक यांनी औषधी व महर्षि सुश्रूत यांनी शल्यचिकित्सा या दोन वेग वेगळ्या विषयांवर सखोल अभ्यास’ करून ग्रंथ निर्मिती केली.
आयुर्वेदाची मूळ तत्वे:
आयुर्वेद असे म्हणतो की, संपूर्ण विश्व पाच ततवनि मिळून बनलेले आहे. ते म्हणजे, वायु (Air), जल (Water), आकाश (Space or Ether), पृथ्वी (Earth) आणि तेज (Fire). ह्यानाच पंचमहाभूते म्हणतात. याच्याशी संबंधित मानवी शरीरातील कफदोष, पित्तदोष व वातदोष निर्माण झालेले आहेत. यालाच त्रिदोष म्हणतात. आयुर्वेदा प्रमाणे मानवी शरीरात सप्तधातु (Seven Tissues) आहेत, रस (Tissue Fluid), मेद (Fat & Connective Tissue), रक्त (Blood), अस्थि (Bone), मज्जा (Marrow), मास (Muscle) आणि शुक्र (Semen), आणि तीन मल (Waste Product), पुरिष (Faeces), मूत्र (Urine) आणि स्वेद (Sweat).
पंचकर्म ही आयुर्वेदातील महत्वाची प्रक्रिया आहे. पंचकर्म ही शरीराची अंतर्गत व बाह्य शुद्धी करिता आहे. यामुळे शरिराचे पुनर्जन, स्वच्छता व दीर्घायु प्राप्त होते. पंचकर्मामध्ये पाच’ प्रक्रिया आहेत, ज्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडतात. विरेचन (Purgation through use of powders, pastes or decoction). वमन (forced therapeutic emesis by use of some medicines), बस्ती (Use of enemas prepared from medicated oils), रक्त मोक्ष (Detoxification of blood) आणि नस्य (Administration of medicines like decoctions, oils and fumes through nasal route). पंचकर्मामध्ये तीन पायऱ्या आहेत. पूर्वकर्म, प्रधानकर्म
व पश्चातकर्म. पूर्व कर्मामध्ये (Preparatory process of the body for the therapy), प्रधान कर्मामध्ये (the main process of therapy) आणि पश्चातकर्मामध्ये (consisting of regimens to be followed to restore digestive and other absorptive procedures of the body, back to the normal state).
आयुर्वेदाचे आठ भाग आहेत. कायाचिकित्सा (Internal medicine treatment), भूतविद्या (Treatment of psychological disorders), कुमार भृतीय (Paediatric treatment), रसायन (Pharmacology), वाजीकरणा (Treatment through aphrodisiacs and eugenics), शल्य (Surgical treatment), शालाकया(Otorhinolaryngological and ophthalmological treatment), अगदतंत्र (Toxicological studies).
प्राचीन भारतात याशिवाय सिद्ध, युनानी, होमिओपॅथी, योग व नाचरोपॅथी ह्या आरोग्य विषयक पद्धती होत्या व आहेत. यातील युनानी ही ग्रीक मधून आलेली व इसविसन पूर्व ४६०–३६६ मध्ये हिप्पोक्रेटस ह्या ग्रीक वैद्यकाने शोधलेले पद्धत आहे. होमिओपॅथी ही जर्मनीतून आलेली व १७वया शतकाच्या मध्यंतरात डा साम्युअल हाहनेमन याने शोधलेली पद्धत आहे. पण तिला प्राचीन म्हणत येणार नाही. नाचरोपॅथी ही देखिल जर्मनीतून अगदी अलीकडे म्हणजे १९ व्या शतकात आलेली आहे. परंतु, योगदर्शन ही पूरक पद्धती मात्र जवळपास वेदकाळापासून अस्तित्वात आहे व ती आयुर्वेदला पूरक आहे.
अग्निकर्म:
साधारणत: ३००० वर्षांपासून भारतात अग्निकर्म ही पद्धती अस्तित्वात आहे. अग्निकर्म म्हणजे प्राथमिकत: शरिराच्या विशिष्ट / ठराविक भागावर नियंत्रित पद्धतीने गरम केलेल्या लोखंडाच्या दंडाने वेगवेगळ्या प्रकारच्या रोग किंवा अनियमितता नष्ट करण्या करिता स्पर्श करणे. अग्नि (Fire) आणि कर्म (Procedure) म्हणजे अग्निचा उपयोग करून रोगावर विजय. जे रोग शल्य चिकीतसेनेही बरे होत नाही किंवा क्षारकर्मानेही बरे होऊ शकत नाही अशा रोगांकरीता अग्निकर्म वापरण्यात यावे असा उल्लेख आहे.
दहणोपकरणा:
याचा अर्थ अग्निकर्म करण्याकरिता लागणाऱ्या वस्तु किंवा साधने, उदाहरणार्थ, औषधी, वस्तु वगैरे. आचार्य सुश्रुतानी याची एक सूचीच दिलेली आहे.
२) तवकदग्ध: पिपली, आजासक्रीडा, गोदंत, शर्व, शलाक
३) मामसदग्ध: जंबावस्त शलाका, आणि’ धातू
४) सिरा, संधि, अस्तिदग्ध: मधू, गूळ, स्नेह
साधने: अग्निकर्माकरिता लागणाऱ्या साधनांची यादी महर्षि सुश्रुत व महर्षि वागभटणी दिलेली आहे.
१) वलय
२) बिंदु
३) विलेखा
४) प्रतिसारण
५) अर्धचंद्र
६) स्वस्तिक
७) अष्टपाद
याबाबत खरे तर अधिक विस्ताराने माहिती उपलब्ध आहे, परंतु तो या लेखाचा विषय नाही. अग्निकर्मात आधुनिक वैद्यक शास्त्रातील एलेक्ट्रिक कोटरी (Electric Cautery) व डायथरमि (Diathermy) ह्या संकल्पना आढतळतात. भारतातील प्राचीन आरोग्यशास्त्र किंवा वैद्यक शास्त्र वा शल्यचिकित्सा शास्त्रयावर प्रदीर्घ संशोधन होऊ शकते यात काहीच शंका नाही, परंतु प्रस्तुत लेख सर्वसामान्य वाचकांना आपल्या अभिमानास्पद आरोग्य संपत्तिचे मूळ संस्कृत भाषेत कसे दडलेले आहे एवढ्याच एका उद्देशाने लिहिलेला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संस्था अशा प्रकारचे शोध निबंध वेळोवेळी प्रसिद्ध करीत असतात, आयुर्वेदाचे व वैद्यक शास्त्राचे विद्यार्थी व संशोधक ते संदर्भ करिता पहात असतात. ज्या वाचकाना याबाबत अधिक जिज्ञासा असेल त्यांनी जरूर अशा प्रकारचे संदर्भ साहित्य पहावे. इडके मात्र नकी खरे आहे की, आपल्या महान देशातील ज्ञानभंडार हे विविध विषयांवर उपलब्ध आहे व ते सर्वश्रेष्ठ व जगातील अत्यंत श्रीमंत भाषेत, म्हणजे संस्कृत भाषेत उपलब्ध आहे. त्याकरिता प्रत्येकाने संस्कृत शिकणे आवश्यक आहे.
+++++++++++++++++++++***+++++++++++++++++++
© Mukund Bhalerao
Accredited Speciality Speaker
Maharashtra Medical Council, Mumbai