Marathi My Articles

राष्ट्रीय विज्ञान दिन

आज २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. देशाचे महान शास्त्रज्ञ डॉ चंद्रशेखर व्यंकट रामन यांनी आजच्या दिवशी जी किमया केली होती, त्यामुळे त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

महान वैज्ञानिक भौतिक शास्त्रज्ञ सर डॉ चंद्रशेखर वेंकट रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी भौतिकशास्त्रातील विषयावर एक महत्त्वपूर्ण शोध लावला होता. पारदर्शी पदार्थामधून जाणाऱ्या प्रकाशांचा किरणात बदल करणारा हा बदल रामन यांनी शोधून काढला. त्यामुळे, त्यांना १९३० साली भौतिकशास्त्रामध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे, ते केवळ पहिले भारतीय नव्हते तर आशियातील पहिले व्यक्ती होते. हा शोध लावल्यानंतर, त्यांच्या सन्मानार्थ १९८६ पासून, देशभरात या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. १९५४ साली भारत सरकारने त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारत रत्न’ देऊन त्यांचा सन्मान केला.

अतिप्राचीन भारतामध्ये ज्ञानाच्या विविध शाखांमध्ये खूप महत्वपूर्ण काम केलेले आहे. भाषाशास्त्रापासून ते अंतराळ विज्ञानापर्यंत सर्व विषयांमध्ये अनेक ऋषिमुनि व संतानी भरीव कार्य केलेले आहे व हे सर्व अनेक शतकांमध्ये झालेले आहे. नवीन तंत्रज्ञानुसार काही शास्त्रज्ञानी द्वारकेच्या समुद्राखालील अवशेषांचा अभ्यास करून ते अवशेष ९५०० वर्षांपूर्वीचे असावे असा अंदाज बांधलेला आहे. भगवान श्रीकृषणाने द्वारकेची निर्मिती महाभारताच्या युद्धानंतर केलेली आहे. तसेच श्रीमद भगवदगीतेमध्ये वेदांचा उल्लेख आहे याचाच अर्थ वेदांची निर्मिती ही महाभारतपूर्व काळातील आहे.

वेद, उपनिषदे, आरण्यके व संहिता या प्रचंड ज्ञान भांडारात असा एकही विषय नाही की ज्या बाबत काहीच उल्लेख नाही. भाषाशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, तर्कशास्त्र, तत्वज्ञान, खगोलशास्त्र, विमानशास्त्र, आरोग्यशास्त्र, औषधशास्त्र, नौकाशास्त्र, अंकगणित, बीजगणित, भूमिती, त्रिकोणमिती, मानसशास्त्र, वनस्पतिशास्त्र, जिवशास्त्र वगैरे. त्यातील बरचसे विषय नंतरच्या काळात काही प्रवाशांच्या माध्यमातून पूर्वेकडे व पश्चिमेकडे पोहोचले, अगदी पायथागोरसचा सिद्धांत देखिल. “आपल्याकडच्या रामायण व महाभारतात खूपच सुंदर गोष्टी आहेत. त्यातून त्यावेळचा समाज, त्यातल्या जाती आणि वर्गव्यवस्था कशी होती याचं चित्र उभं करता येते. त्यात वर्णीलेल्या गोष्टींवरुन कोणाला वाटेल की, त्याकाळी आपल्याकडेही लेझरसारखे किरण, अतिसंहारक शस्त्रं, मिझाइल्स, चिरंजीव करणारी औषधं, विमानं आणि इतर बऱ्याच गोष्टी होत्या की काय ! पण अर्थातच त्या कल्पनाच होत्या. खरतर त्या कल्पना म्हणूनही खूपच मोठ्या होत्या. त्यांना ‘सायन्स-फिकशन’ म्हणता येईल, आणि ‘सायन्स-फिकशन’ चे महत्व प्रत्यक्ष विज्ञाच्या प्रगतीमध्ये काही कमी नाही. कित्येक गोष्टी या प्रथम ‘सायन्स-फिकशन’ मध्ये लोकांनी कल्पिल्या आणि नंतर त्या प्रत्यक्षात अस्तित्वात आल्या. आयझ्याक असीमॉव्हन प्रथम यंत्रमानवाची कल्पना मांडली आणि नंतर काही दशकातच रोबोज तयार झाले. आर्थर क्लार्कने कृत्रिम उपग्रहाची कल्पना मांडली आणि तंत्रज्ञानी नंतर त्याची निर्मिती केली. त्या अर्थाने खूप पूर्वीच्या काळी एवढ्या प्रगत गोष्टींची केवळ कल्पनाही करणं हाही एक ‘ग्रेट’ च प्रकार होता, अस म्हणाव लागेल.”
[साभार संदर्भ: किमयागार–अच्युत गोडबोले, पृष्ठ: ३].
The universe was a mystery to man in the primitive stage; it has not ceased to be so far civilised man even in this twentieth century. We find scientists like the late Sir James Jeans writing books on the scientific view of the universe with such titles as ‘The Mysterious Universe’. If after all these marvellous scientific discoveries and inventions, the scientist still treats nature as profoundly mysterious; if, in spite of all the vast knowledge that he has gained, the scientist feels that he has only scratched the surface of nature, that he is yet far away from the heart of the problem of the universe, we have to pause and ask the question as framed by Adi Shankarachyarya: “तत्त् किं ततत् किं?” ‘What else? What else?’
[साभार संदर्भ आधार: Physical Science and the Mystery of Man: from Science and Religion by Swami Ranganathananda, Page-24]
The architect of the modern world is science, and by modern thought is meant scientific thought. The aim of science is to study nature and human experience objectively. To quote Karl Pearson (Grammar of Science,1990,Page-6) “The classification of facts, the recognition of their sequence and relative significance is the function of science, and the habit of forming a judgement upon these facts unbiased by personal feeling is characteristic of what may be termed the scientific frame of mind.”
In the nineteenth century, knowledge of the physical world was not deep enough, and scientists looked only at the surface of things. But, along with the discovery of such facts as radio-activity and insight into the nucleus of the atom, the nucleus of the atom, the realisation has come that there is a severe limitation placed on our knowledge regarding the truth of the external world. Science owns today that it deals only with the appearance of things and not with the reality behind these appearances.
[साभार आधार: Limitation of Physical Science – Page-19-20 of Science and Religion].
ह्या पार्श्वभूमीवर, अतिप्राचीन भारतीय वैज्ञानिक शोधांचा मागोवा घेणे अधिक गरजेचे आहे. धर्म ही संकल्पना मुळातच ‘धर्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धती’ अशी आहे. भारतीय संकल्पनेनुसार जीवनाचे अंतिम उद्दिष्ट फक्त ऐहिक सुखसमाधान नाही, तर त्यापलीकडे जाऊन ‘मुक्ती प्राप्त करणे’ आहे आणि हाच मूलभूत फरक पौर्वात्य व पाश्चिमात्य तत्वज्ञानात आहे. त्यामुळे युरोप व अमेरिकेतील शास्त्रज्ञ ‘जीवन सुखकर करणे’ ह्यापाशीच थांबतात; परंतु भारतीय विचार दर्शने जीवनाचा खरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतात. इतके असले तरिही ‘शरीर माध्यम खलु धर्म साधनं’ हेही तितकेच खरे आहे.

सर्वच संशोधने ही ऐहिक सुखासाठीच नसतात, जसे सुश्रुतसंहिता, वागभट यांचे आरोग्यशास्त्रातील कार्य. शरीर तर स्वस्थ रहायलाच पाहिजे, कारण त्याशिवाय ऋषीमुनिना देखिल तपश्चऱ्या करणे शक्य झाले नसते; आणि म्हणूनच योगशास्त्रही तितकेच महत्वाचे आहे व होते. जशी इंग्रजी भाषेत एक म्हण आहे ‘Health is Wealth’. आरोग्याच्या अभावी कुणीही कुठलेही काम व्यवस्थित करु शकत नाही, मग तो कुठल्याही व्यवसायात असो. याचाच अर्थ असा की शरीर स्वस्थ असणे मूलत: आवश्यक आहे.

आता आपण विविध क्षेत्रात प्राचीन काळात केलेल्या मुलगामी संशोधनाचा थोडक्यात आढावा घेऊ.

भाषाशास्त्र: विज्ञान या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ भौतिक विज्ञान असा घेतल्या जातो, ज्यात रसायनशास्त्र, जीवशास्त्र, धातुशास्त्र, वनस्पतिशास्त्र, आरोग्यशास्त्र, औषधिनिर्माणशास्त्र, स्थापत्यशास्त्र, अवकाशशास्त्र, शरीरचनाशास्त्र वगैरे विषयांचा समावेश होतो; परंतु खऱ्या अर्थाने ‘विज्ञान’ या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. विज्ञान या शब्दात सामाजिक विज्ञान देखिल समाविष्ट आहे, व भाषाविज्ञान सुद्धा तितकेच महत्वाचे आहे; कारण भाषेचा सरळ संबंध संस्कृतिशी आहे. याबाबत प्रसिद्ध संस्कृतिविषयाचे लेखन करणारे लेखक श्री. राजीव मल्होत्रा यांनी त्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘Sanskrit Non-Translatables’ या पुस्तकात असे म्हटले आहे की,
“Samskriti is the lore and repository of human sciences, art architecture, popular song, classical music, dance, theatre, sculpture, painting, literature, pilgrimage, rituals and religious narratives, all of which embody pan-Indian cultural traits. It also incorporates all branches of natural science and technology, including medicine, botany, mathematics, engineering, architecture, dietetics among others. (Page-xxxvi).”
संस्कृतीचा वारसा हा मुख्यत्वेकरून भाषेच्या माध्यमातून पुढच्या पिढीला हस्तांतरित होत असतो, आणि म्हणून भारतीय संस्कृति समजण्याकरिता संस्कृत भाषा बोलता, लिहिता व वाचता येणे अत्यंत आवश्यक आहे. ब्रिटिशांच्या १५० वर्षाच्या गुलामगिरीत सर्वात जास्त नुकसान झाले असेल तर ते इंग्रजांच्या तथाकथित आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे, कारण संस्कृत च्या ऐवजी इंग्रजी भाषा लादून इंग्रजानी पद्धतशीरपणे भारतीयांची सांस्कृतिक नाळच तोडून टाकली. या सांस्कृतिक अतिक्रणामुळे भारताच्या ३-४ पिढ्यानी भारतीय संस्कृतीच्या खऱ्या स्वरूपाचे विस्मरण झाले व अव्याहत पिढ्यानपिढ्या आलेला सांस्कृतिक वारसा खंडित झाला.
“A culture comprises the cumulative collective experience that is unique to its people and is invariably interwoven with their geography and history. To understand the nuances of a word in its entirety, it is essential to understand the host culture. Language, both reflects and shapes, a culture’s thought process owing to its deep structures and categories. The unique experiences of different cultures are not always interchangeable. Many cultural artifacts have no equivalent in other cultures, and to force such artifacts into Western templates results in distortions. This too is a kind of colonization and cultural conquest. Therefore, certain words used to refer to those experiences must remain intact. Over time, if linguistic terms and categories get lost, so does the diversity of cultural experience. (Threat of Western Universalism from ‘Sanskrit Non-Translatables’ by Rajiv Malhotra, Page xxxiv – xxxv)”
वेद म्हणजे अक्षरश: ‘ज्ञान’. वेदांना ‘श्रुती’ असे देखिल म्हटल्या जाते, याचे कारण श्रुती म्हणजे ‘ऐकणे’; अर्थातच ‘लक्षात ठेवण्याचे’ किंवा ‘ऐकण्याची माहिती’. वेद हे फार दीर्घ काळपर्यंत पुस्तक रूपात उपलब्ध नव्हते, तर पिढ्यानपिढ्या मुखोद्गत पद्धतीने उच्चार करून पाठांतर करून लक्षात ठेवणे असे स्वरूप होते. काळाच्या प्रवाहात वेदांच्या श्रुती लक्षात ठेवण्याकरीता एकूण ११ प्रकारच्या पद्धती विकसित केल्या गेल्या, त्यातील कमीत कमी तीन तर खूप जुन्या आहेत.
याठिकाणी आपण, विषयाचे अनुषंगाने चार प्रमुख उच्चारण पद्धतींची थोडक्यात माहीत करून घेऊ. उदाहरणार्थ, ‘जटापद’ पद्धतीमध्ये, उच्चार करण्याच्या पद्धतीमध्ये प्रथम पहिली जोडी, नंतर, तेच उलट्या पद्धतीने, मग सामान्य पद्धतीने, मग विराम. ‘घनपाठ’ पद्धतीमध्ये, आधी प्रथम जोडी, तीच जोडी उलट क्रमाने, नंतर पहिले तीन शब्द, मग तेच तीन शब्द उलट्या क्रमाने, नंतर सामान्य पद्धतीने, विराम वगैरे. एक प्रत्यक्ष उदाहरण पाहूया.

|| ऋग्वेद संहिता – ८.१००.११ ||
देवीं वाचमजनयन्त देवास्तां विश्वरूपाः पशवो वदन्ति ।| 8.100.11 ||
सा नो मन्द्रेषमूर्जं दुहाना धेनुर्वागस्मानुप सुष्टुतैतु ॥ 8.100.11 ||

याचा अर्थ आहे, देवांनी वाणीरूपी देवी उत्पन्न केली आणि सगळे प्राणिमात्र तिचा उपयोग करतात. ती सर्वाना आंदनदीत करणारी, अन्न उत्पन्न करो. शक्ति प्रदान करो…
पद: देवीं | वाचं | अजनयन्त् | देवा | स्तम् | विश्वरुपा: | पशवो | वदन्ति | सा | नो | मंद्र | इशम | उर्जम् | दुहाना | धेनुर् | वाग | अस्मान | उप | सुस्षटुता | अ | एतु ||
क्रम: देवीं वाचं | वाचं अजनयन्त् | अजनयन्त् देवाह | देवाह तम | तम विश्वरुपा: | विश्वरुपा: पशवो | विश्वारूपा: इति विश्व-रुपा: | पशवो वदन्ति | वदन्तिती वदन्ति | ..उप सुषटुषा | सुष्टुतैतु | सुष्टुतैतु सुष्टुतैता | ऐतू | इतेव इति एतु |
जटा: देवीं वाचं वाचं देवीं देवीं वाचं | वाचं अजनयनन्ता द अजनयनन्तातिअजनयनन्ताषत वाचं वाचं अजनयन्तां | अजनयन्तां देवीं देवीं अजनयन्त्अजनयन्त् देवाह | देवाह तम तम देवा देवा तम | तम विश्वरुपा: विश्वरुपा: तम तम विश्वरुपा: | विश्वरुपा: पशवो विश्वरुपा: विश्वरुपा: पशावो |
विश्वरुपा: इति विश्व-रुपा: | पशावो वदन्ति वदन्ति पशावो वदन्ति | वदन्ति वदन्ति | ..उप सुस्तुता सुस्तुता सुस्तुतोपोपा सुस्तुता | सुस्तुतैव येतव ए सुस्तुता सुस्तुतैतू | सुस्तुतैतू सु-स्तुता | ऐतू | इतेव इति येतू |
घन: देवीं वाचं वाचं देवीं देवीं वाचं अजनयन्तातुअजनयन्ता ो वाचं देवीं देवीं वाचं अजनयन्तासं | वाचं अजनयन्ता इअजनयन्तादे वाचं वाचं अजनयन्तायू देवा देवा अजनयन्तावद वाचं वाचं अजनयन्ता देवाह |
एकट्या ऋग्वेदात, एकूण १०,४६२ ऋचा व १,५३,८२६ शब्द आहेत. सर्व वेदांचा, उपनिषदांचा, अरण्यकांचा व संहितांचा अभ्यास व तोही फक्त पाठांतर करून हे किती जिकिरीचे, अवघड काम आहे; परंतु वरील पठणाच्या अद्वितीय पद्धतींचा उपयोग करून शेकडो वर्षांपासून ही एकमेवाद्वितीय ज्ञानसंपदा आपल्या पर्यन्त आणून पोहोचविणाऱ्या महान पुरूषांचे आपण ऋणी आहोत.

गणित / भूमिती / त्रिकोणमिती :
यथा शिखा मयूरणां नागानां मणयो यथा | तद्वद वेदांगशास्त्राणां गणितं मूर्धनि स्थितम् || (याजुष ज्योतिषम्)
ज्याप्रमाणे मोराचा तुरा आणि नागांचा मणी सर्वात वर असतो, त्याच प्रकारे वेदांगशास्त्रांमध्ये गणिताचे स्थान सर्वोच्च आहे. भरतामध्ये, दोन वेगळे वेगळे विचारवंत आहेत. पहिले, ‘इति’ म्हणजे ते जे पूर्णत्व मानतात व दुसरे, जे ‘नेति’ मानतात, अर्थात, शून्यत्व स्विकारणारे. शून्याचा शोध भारतातच लागला हे सर्व श्रुतच आहे. पुरीचे शंकराचार्य श्रीमत् भारती कृष्णतीर्थ यांनी आपल्या गणितशास्त्राच्या ‘वैदिक म्याथेम्याटिक्स’ (Vedic Mathematics) या पुस्तकाच्या प्रस्तावनेत असे लिहिले की, “या संदर्भात हे नमूद करण्यास आनंद वाटतो की, काही तथाकथित भारतीय विद्वानांच्या दृष्टीकोणाहून वेगळा असा दृष्टीकोन प्रा.जी.पी. हॉलस्टँड, प्रा. गिन्सबर्ग, प्रा. डी. मॉर्गन, प्रा. हटन या आधुनिक गणितज्ञांनी मांडला आहे. ते सत्यान्वेषी व सत्यप्रेमी असून त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार केला व प्राचीन भारताने गणितातील ज्ञानाच्या प्रगतीसाठी दिलेल्या अप्रतिम योगदानाची निष्कपट वृत्तीने आणि मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.”
(साभार संदर्भ आधार: भारताची उज्ज्वल विज्ञान-परंपरा: लेखक: सुरेश सोनी, अनुवाद: डॉ. क.क्रु.क्षीरसागर, पृष्ठ- ७०-७१).

अंकगणित:
यजुर्वेदामध्ये, खालील मंत्रात १२ पर्यन्त गणना केलेली आढळते.
“सविता प्रथमेsहन्नग्निर्दवितीये वायुस्तृतीयsआदित्यश्चतुर्थे चंद्रमा:पंचमsऋतु: षष्ठे मरुत: सप्तमे बृहस्पतिरष्मेs मित्रो नवमे वरुणो दशमsइन्द्र एकादशे विश्वेदेवा द्वादशे ||” (यजुर्वेद संहिता–अध्याय ३९, मंत्र-६). प्राचीन ग्रीकांना माहीत असलेली सर्वात मोठी संख्या म्हणजे ‘मिरियड’, ज्याचे मूल्य होते १०४ म्हणजेच (१० x १० x १० x १० ) १०,०००. तसेच, रोमन लोकांना माहीत असलेली सर्वात मोठी संख्या होती ‘मिली’, याचे मूल्य होते १०३, अर्थात १,०००. प्रथम दशगुणोत्तर संख्या:
इ॒मा मे॑ऽअग्न॒ऽइष्ट॑का धे॒नवः॑ स॒न्त्वेका॑ च॒ दश॑ च॒ दश॑ च श॒तं च॑ श॒तं च॑ स॒हस्रं॑ च स॒हस्रं॑ चा॒युतं॑ चा॒युतं॑ च नि॒युतं॑ च नि॒युतं॑ च प्र॒युतं॒ चार्बु॑दं च॒ न्य᳖र्बुदं च समु॒द्रश्च॒ मध्यं॒ चान्त॑श्च परा॒र्द्धश्चै॒ता मे॑ऽअग्न॒ऽइष्ट॑का धे॒नवः॑ सन्त्व॒मु॒त्रा॒मुष्मिँ॑ल्लो॒के ॥२ ॥
पदपाठ:
इ॒माः। मे॒। अ॒ग्ने॒। इष्ट॑काः। धेनवः॑। स॒न्तु॒। एका॑। च॒। दश॑। च॒। दश॑। च॒। श॒तम्। च॒। श॒तम्। च॒। स॒हस्र॑म्। च॒। स॒हस्र॑म्। च॒। अ॒युत॑म्। च॒। अ॒युत॑म्। च॒। नि॒युत॒मिति॑ नि॒ऽयुत॑म्। च॒। नि॒युत॒मिति॑ नि॒ऽयुत॑म्। च॒। प्र॒युत॒मिति॑ प्र॒ऽयुत॑म्। च॒। अर्बु॑दम्। च॒। न्य॑र्बुद॒मिति॒ निऽअ॑र्बुदम्। च॒। स॒मु॒द्रः। च॒। मध्य॑म्। च॒। अन्तः॑। च॒। प॒रा॒र्द्धः। च॒। ए॒ताः। मे॒। अ॒ग्ने॒। इष्ट॑काः। धे॒नवः॑। स॒न्तु॒। अ॒मुत्र॑। अमुष्मि॑न्। लो॒के ॥२ ॥ (यजुर्वेद: अध्याय-१७, मंत्र-२)
वरील रुचेमध्ये पुढील संख्या मागच्या संख्येपेक्षा दहापट आहे. जसे, एक – दहा – शंभर – सहस्त्र – अयुत – नियुत – प्रयुत – चार्बुद -न्यार्बुद – समुद्र – मध्य – अन्त – परार्ध अशी आहे, म्हणजेच परार्धाची किंमत होते १०१२. इसवीसनापूर्वी ५ व्या शतकात खूप मोठया संख्या उपयोगात होत्या. त्यातील सर्वात लहान १०५ होती तर सर्वात मोठी संख्या होती १०४००००००००००००००००० (प्यारो). याचा उल्लेख A Universal History of Numbers by Georges Ifrah, Pages-422-423 मध्ये आढळतो (https://en.wikipedia.org/wiki/History_of_large_numbers).

भूमिती:
वेदकाळापासून, यज्ञ करण्याकरिता यज्ञवेदींची रचना करीत होते. त्यांचा आधार भूमितीच होता. इसविसनापूर्वी ८०० वर्षे, बोधायन आणि आपस्तंभ या महर्षिंनी त्यांच्या ‘शल्बसूत्रात’, यज्ञ वेदींची रचना करण्याकरिता काही विशिष्ट अशी ठराविक परिमाणे (Standards) तयार केली होती. बोधायन:
दीर्घचतुरश्रस्याक्षणया रज्जु: पार्श्रवमानी तिर्यग् मानी च यत्पृथग्भूते कुरुत्स्तदुभयं करोति॥
(https://en.wikipedia.org/wiki/Baudhayana_sutras). याचा अर्थ, कोणत्याही काटकोन त्रिकोणाच्या कर्णावरील चौकोणाची बेरीज ही इतर दोन बाजूंवरील चौकोणाच्या क्षेत्रफळा एवढी असते. हा सिद्धांत पायथ्यागोरसच्या जवळपास एक हजार वर्ष आधी मांडलेला आहे, परंतु तो जगासमोर आला नसल्यामुळे तो बोधायनांच्या ऐवजी पायथ्यागोरसच्याच नावाने प्रसिद्ध झाला. या बाबत विस्तृत विवेचन पृष्ठ क्रमांक ३४९, Chapter-XXXVII – Pythagorax’ Theorem etc., Vedic Mathematics or Sixteen Simple Mathematical Formulae from the Vedas, by Jagdguru Swami Sri Bharati Krishna Tirthji Maharaj, Shankrachyarya (www.ms.uky.edu/). [श्रीमद्भास्कराचार्यविरचित सिद्धांतशिरोमणे: गोलाधाय:, व्याख्याकर: पंडित केदारदत्त जोशी, प्रकाशक:मोतीलाल बनारसीदास, प्रथम संस्करण-1988]
खरेतर वैदिक गणित हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो, परंतु या लेखाचा तो मुख्य विषय नसल्यामुळे, इथे फक्त अति प्राचीन काळातील वैदिक गणिताचा आवक किती मोठा आहे याची कल्पना येणे एवढाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन पुढील विषयाकडे वळू.

रसायनशास्त्र / धातूशास्त्र :
रसायनशास्त्राचा संबंध हा धातूशास्त्र व आरोग्यशास्त्राशीही आहे. आधुनिक भारतातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ प्रफुल्लचंद्र राय यांनी ‘हिंदू केमेश्त्री’ (Hindu Chemistry) हा रसायनशास्त्रावरील ग्रंथ लिहिला आहे. रसायनशास्त्र हे प्रयोगावर आधारलेले शास्त्र आहे. प्राचीन भारतात, नागार्जुन (रसरत्नाकर, कक्षपुटतंत्र, आरोग्यमंजिरी, योगसार, योगाश्क्च), वागभट (रसरत्नसमुच्चय), गोविंदाचार्य (रसार्णव), यशोधर (रसप्रकाशसुधाकर) आणि सोमदेव (रसेंद्रचिंतामणी) यांचे रसायन शास्त्रातील योगदान अमूल्यच आहे. त्यामध्ये, महारस, उपरस, सामान्यरस, रत्न, धातू, विष, क्षार, आम्ल, लवण व लोहभस्म् यांचा’उल्लेख आढळतो. महारसमध्ये, अभ्रम, वैक्रांत, भाषिक, विमला, शिलाजतु, सास्यक, चपला व रसक यांचा समावेश केलेला आहे. ऊपरसामध्ये, गंधक, गैरीक, काशिस, सुवरि, लालक, मन:शिला, अंजन व कंकुष्ठ हे अंतर्भूत आहेत. सामान्य रस या वर्गात, कोयिला, गौरीपाषाण, नवसार, वराटक, अग्निजार, लाजवर्त, गिरिसिंदूर, हिंगुल व मुर्दाड शृंगकम् यांचा विचार केलेला आहे.

रसायनशास्त्राचा उपयोग आयुर्वेदातही केलेला आहे. महर्षि चरकांनी, वेगवेगळ्या शारीरिक व्याधींवर, धान्यासव, फलासव, मूलासव, सरासव, पुष्पासव, पत्रासव, कांण्डासव, त्वगासव, शर्करासव वगैरे. औषधींची निर्मिती केली. याठिकाणी, त्याकाळातील शास्त्रज्ञांची मनोवृत्ति कशी प्रयोगशील होती याचा एक संदर्भ असा आहे की, डॉ रुद्रदेव त्रिपाठी यांनी ‘रुद्र यामलतंत्र’ ह्या त्यांच्या पुस्तकात असे म्हटले आहे की,
“इति सम्पादितो मार्गो द्रुतीनां पातने स्फुट: | साक्षादनूभवैर्द्रुषटो न श्रुतो गुरुदर्शित: | लोकानामुपकाराय एतत् सर्वं निवेदितम् | सर्वेशाम चैव लोहानां प्रावणं परिकीर्तितम् ||” (रसकल्प: अध्याय-३)
[साभार आधार संदर्भ: भारताची उज्ज्वल विज्ञान परंपरा: लेखक-सुरेश सोनी, पृष्ठ: १२० ते १२४]

वनस्पतिविज्ञान:
निसर्गाचे निरीक्षण, परीक्षण व विश्लेषण करण्याची प्रवृत्ती व पद्धती वैदिक काळापासून अस्तित्वात आहे. अथर्ववेदात, झाडांचा आकार व इतर गुणांच्या आधारे वर्गीकरण केले आहे, वृक्ष, तृण, औषधी, क्षुपे, लता, अवतान् व वनस्पती. महाभारताच्या शांतिपर्वात १८४ व्या अध्यायात, महर्षि भारद्वाज आणि महर्षि भृगु, यांच्यामध्ये झालेल्या संभाषणात वनस्पति शास्त्राविषयी, खूप महत्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे आढळतात. त्याची सुरुवात होते ७ व्या श्लोकात होते, महर्षि भारद्वाज यांच्या प्रश्नाने. अनुषम्णामचेष्टानां घनानां चैव तत्वत: | वृक्षाणां नोपलभ्यन्ते शरीरे पंच्य धातव: ||७||
असे वाटते की झाडांमध्ये उष्णता नाही. ते घट्ट पदार्थापासून बनलेले आढळतात. त्यांच्यामध्ये पाच मूलतत्वे दिसून येत नाहीत.
न श्रुणव्न्ति न पश्यन्ति न गन्धरसवेदिन: | न च स्पर्श विजानन्ति ते कथं पांच्यभौतिका:||८||
वृक्ष ऐकू शकत नाहीत. ते पाहू शकत नाहीत. ते वास घेऊ शकत नाहीत. त्यांना चव घेत येत नाही. ते स्पर्श करु शकत नाही. तर मग, ते पाच मूल तत्वांपासून बनलेले आहेत हे कसे काय?
अद्रवत्वादनग्नित्वादभूमित्वादवायुत: | आकाशस्याप्रमेयत्वाद वृक्षाणां नास्ति भौतिकम् ||९||
मला असे वाटते की, त्यांच्यामध्ये (वृक्षात) कुठलाही द्रवपदार्थ नसताना, उष्णता नसताना, जमीन नसताना, वायु नसताना, कुठलीही रिकामी पोकळी नसताना त्यांना पाच मूल तत्वांपासून बनलेले संयुक्त कसे म्हणत येईल?
यावर, महर्षि भृगुनी त्याना उत्तर दिले ते खालील प्रमाणे आहे.
घनानामपि वृक्षाणामाकाशोsस्ति न संशय: | तेषां पुष्पफलव्यक्तिर्नित्यं समुपपद्यते ||१०||
वस्तूत: वृक्ष घन स्वरूपात दिसत असले तरिही, वृक्षांच्या आत पोकळी असते. त्यांना फुले व फळे येतात.
उश्तोये म्लायते पर्णं त्वक् फलं पुष्पमेव च | म्लायते शीर्यते चापि स्पर्शस्तेनात्र विदयते ||११||
त्यांच्या आंत पानांमध्ये, सालींमध्ये, फळांमध्ये, फुलांमध्ये उष्णता असते, आणि फळे पडताना दिसतात. यावरून असे लक्षात येते की, त्यांना स्पर्शज्ञान देखिल आहे.
वाय्वग्य्ूशनिनिर्घोषै फलं पुष्पं विशीर्यते | श्रोत्रेण गृहयते शब्दस्तस्माच्ण्वातन्ति पादपा: ||१२||
हवा, अग्नि आणि वादळांच्या आवाजाने फळे व फुले खाली पडतात. आवाज कानांद्वारा ऐकता येतो, त्यामुळे असे म्हणत येईल की, वृक्षांना कां असतात व ते त्यांच्या कानाने ऐकतात.
वल्ली वेश्यते वृक्षं सर्वत श्च्ऐव गच्तित | न ह्यदृष्टेश्च् मार्गोsस्ति तस्मात पश्यन्ति पादपा: ||१३||
वेली स्वत: वृक्षासभोवती गुंडाळून घेतात. वेलीना दृष्टी नसती तर त्यांनी स्वत:ला कसे वृक्षाभोवती परिधान करून घेतले असते. याचाच अर्थ वेलीना व वृक्षाणा दृष्टी असते.
पुण्यापुण्यईस्तथा गंधऐर्धूपैश्च् विविधैरपि | अरोगा: पुषपिता: सन्ति तस्माज्जिघ्रन्ति पादपा: ||१४||
वृक्षांना चैतन्य प्राप्त करण्याची शक्ति आहे. ते सर्व प्रकारच्या दैवी सुवासांकरिता फुलांच्या माध्यमातून सुगंध प्रसारित करतात. याचाच अर्थ वृक्षांना गंध असतो.
पादै: सलिलपानाच्च व्याधीनां चापि दर्शनात् | व्याधिप्रतिक्रियत्वाच्च विद्तेन् रसनं द्रुमे ||१५||
वृक्ष मुळांच्या माध्यमातून पाणी शोषून घेतात. त्यांना सर्व प्रकारचे रोग होतात, आणि ते सर्व रोग त्यांच्यातील काही प्रक्रियांद्वाराच दुरुस्त होतात. यावरून हे स्पष्ट होते की, वृक्षांना चव देखिल कळते. वक्त्रेणोत्पलनालेन यथोर्ध्वं जलमाददेत् | तथा पवनसंयुक्त: पादै: पिबति पादपा: ||१६||
जसे आपण कमळाच्या देठाने पाणी शोषू शकतो त्याचप्रमाणे वृक्ष सुद्धा वायूच्या सहाय्याने मुळांच्याद्वारे पाणी पितात.
सुखदु:खयोश्च् ग्रहणाच्छिन्नस्य च विरोहणात् | जीवं पश्यामि वृक्षाणामचैतन्यं न विदयते ||१७|
| वृक्षाणा आनंद व दु:ख होते व त्याच्या फांद्या तोंडल्यानंतर दु:खही होते. यावरून हे सिद्ध होते की, वृक्षाणा जीव असतो व ते चेतनाहीन नाहीत.
तेन तज्जलमादत्तं जरयत्यग्निमारुतौ | आहारपरिणामाच्च स्नेहो वृद्धिश्च् जायते ||१८||
असे मुळांद्वारे शोषलेले पाणी वृक्ष पचवितात. वृक्ष अशा शोषण केलेल्या पाण्याच्या प्रमाणात वाढतात व जलमय राहतात.

खगोलशास्त्र / अवकाशशास्त्र:
इसवी सनाच्या पाचव्या शतकात (४७६-५५०CE) आर्यभट हे गणितज्ञ / खगोलशास्त्रज्ञ / भौतिकशास्त्रज्ञ होऊन गेले. आर्यभटाने अंकगणित, बीजगणित, त्रिकोणमिति, व भूमितीतील इतर विषया बाबतही बरेच संशोधन केले. आर्यभट्टाने भूमितीत लागणाऱ्या ‘साईन’ फंक्श्नचा विचार व वापरही केला होता. पृथ्वीचा गोलपणा आणि स्वत:च्या अक्षाभोवती (एक्सिस) तिचे फिरणं याचीही त्याला कल्पना होती. त्यांना अवकाशातील ग्रहताऱ्यांच नक्की स्थानही ठाऊक होत. त्यांनी त्यांच्या काव्यात असे म्हटले आहे, “जरी आपल्याला आकाशातले सूर्य, तारे पृथ्वीभोवती फिरल्यासारखे वाटले तरिही खरतर ते स्थिर आहेत व पृथ्वीच त्यांच्याभोवती फिरतेय.” त्यांनी पृथ्वीचा परीघ ३९,७३६ किलोमीटर असा गणिताने काढला होता. आज तो ३९,८४३ किलोमीटर आहे असे मानतात. जवळपास इतके अचूक उत्तर त्याकाळी मिळवणे हा खरोखर अचाटच प्रकार होता. ‘चंद्राला स्वत:चा प्रकाश नसून तो सूर्यापासून मिळालेला असतो’ असे त्यानंचे म्हणणे होते. आर्यभट्टने एक वर्षात ३६५ दिवस, ६ तास, १२ मिनिट आणि ३० सेकंद असतात हेही काढले होते.
[साभार संदर्भ: प्राचीन भारतचं विज्ञानाला योगदान: किमयागर: लेखक: अच्युत गोडबोले, पृष्ठ क्रमांक: ३ ते ५]

तांत्रिकाशास्त्र (Neurology):
संस्कृत भाषेच्या देवनागरी मूळाक्षरांचे स्वरूप, आकार व ध्वनि उच्चारण यामुळे माहितीचे व स्मृतीचे संस्करण करण्याकरिता संपूर्ण मेंदूला उत्तेजित करतात. त्यामुळे, भौतिक व आधिभौतिक, आध्यात्मिक ज्ञानाचे संवेदन होते; तसेच, त्याचा उपयोग स्वयंशिक्षण व वैश्विक ज्ञान प्रसाराकरीता खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो. स्थिरध्वनि डाव्या व संगीतमय खोल व गुंजनारा ध्वनि हा उजव्या मेंदूची संबंधित असतो. पानांची सळसळ, ओढ्याच्या पाण्यावरील तरंगाचे ध्वनि, पक्ष्यांच्या कुजनाचे ध्वनि, वाहणार्या वाऱ्याचा ध्वनि हे नैसर्गिक ध्वनि शांतता निर्माण करतात व त्यांची नोंद उजव्या मेंदूत होते. संस्कृत भाषेच्या उपयोगामुळे (त्यातील उच्चारांमुळे) उजव्या व डाव्या दोनही मेंदूना, अतिशीघ्रपद्धतीने शिकण्याकरीता [Super Accelerated Learning Theory (SALT)] व माहितीचे संस्करण जलद गतीने सहाय्यभूत होते.

मानवी मेंदुमध्ये दोन गोलार्ध (Hemisphere) आहेत, डावा व उजवा व ते दोन गोलार्ध हायपोथ्ल्ममस (Hypothalamus) ने जोडलेले असतात. अति गहण समस्यांचे निराकरण करण्याकरीता नेकोकोरटेक्स असतो; जो सस्तन प्राण्यांमध्ये असतो. तो अंतर्गत ऊर्जेचा उपयोग करून ‘लढणे किंवा पलायन’ करणे ह्या कृती करत असतो. डाव्या मेंदुचा संबंध हा बोलणे, वाचणे, हिशोब करणे, अनुमान काढणे, कार्यकारणभाव शोधणे, तर्क बांधणे, प्रमाण, नियम, कायदा, व्याकरण, उत्कृष्ट एकाग्रता, विश्लेषण, विज्ञान, विस्तृत माहीती व ताल यांच्याशी येतो, तर उजव्या मेंदूचा संबंध शरीरभाषा, खुणा, आकार, उपजत बुद्धी, भावना, सर्जनशीलता, उस्फूर्तता, तीव्र उत्सुकता, खेळ, धोका, कला, नृत्य, संगीत, आपसतील संबंध, चित्रकला, एकात्म विचार व अभ्यंतर यांच्याची येतो.

संस्कृत भाषेत स्वरामध्ये एकूण १६ प्रकारचे दीर्घ व ऱ्हस्व ध्वनि आहेत. हे सर्व ध्वनि, घशातून निर्माण होतात व ते मनुष्याच्या पाठीच्या कण्यामध्ये कंपने निर्माण करतात, जे मेंदूवर अतिसूक्ष्म प्रभाव करतात. ऱ्हस्वध्वनि, अ, इ, उ, ऋ, ए, ओ, अॅं यांचे ग्रहण व विवरण मेंदूच्या डाव्या गोलार्धात होते; तर, दीर्घध्वनि, जसे, आ, ई, ऋ, र्ला, ऐ, औ, अ:, यांचे ग्रहण व विवरण मेंदूच्या उजव्या गोलार्धात होते. भाषेच्या रचनेमध्ये, स्वर स्वाभाविकपणे उजव्या व डाव्या मेंदूला उत्तेजित करतात; ज्यात, ऱ्हस्वध्वनि डाव्या तर दीर्घध्वनि उजव्या मेंदूला कार्यान्वित करतात त्यांच्या गंभीर स्वरूपामुळे. याबरोबर, व्यंजनांचा उपयोग संस्कृत भाषेला संपूर्ण मेंदूला कार्यान्वित करणारी भाषा बनविते. संस्कृत (देवनागरी लिपि) मधील मुळाक्षरे दोन प्रकारच्या रचनेमध्ये विभागलेले आहेत.

(अ) स्वरध्वनि रचना (१६ स्वर):
अ आ इ ई
उ ऊ ऋ ऋ
लर्ऊ र्ल ए ऐ
ओ औ अॅं अ:
वरील स्वरध्वनि ४ x ४ अशा तकत्यात मांडलेले आहेत. अशा स्वरूपाकडे मेंदू एक पूर्ण चित्र म्हणून पाहते. अशा प्रकारे केलेय स्वरांच्या नियोजनामुळे मेंदू त्यास चित्र म्हणून ग्रहण करतो आणि मग हे चित्र (Image) म्हणून मेंदूच्या उजव्या गोलार्धात साठवून ठेवतो. त्याचबरोबर, दीर्घ व ऱ्हस्व ध्वनि उजव्या व डाव्या गोलार्धात जतन करून ठेवतो. दृश्य व ध्वनि च्या सहाय्याने नवीन मार्ग अक्षर व ध्वनीच्या माध्यमातून तयार केले जातात. नुसत्या स्वरांच्याच रचनेमुळे संपूर्ण मेंदू कार्यान्वित होतो व दोनही गोलार्धातील मज्जातंतु जागृत (Neurons are fired) होतात.

(ब) व्यंजने: ध्वनिशास्त्र, स्वरूप व आकार:
क ख ग घ ङ्
च छ ज झ य्ंन
ट ठ ड ढ ण
त थ द ध न
प फ ब भ म
य र ल व
श ष स ह
क्ष त्र ज्ञ
वरील व्यंजनांची निर्मिती ही खूप अनुपूर्व पद्धतीने होते; ज्यात, तोंडाचा उपयोग अनुक्रमिकाभिगम असा होतो. वरील व्यंजने उच्चार करण्याची पद्धती सर्व वाचकास ज्ञात आहेच. हे व्यवस्थित व क्रमश: तार्किक पद्धतीने उच्चारलेले ध्वनि, मेंदूतील डाव्या गोलार्धात क्रियान्वयित (Processed) होतात. ध्वनींच्या सुयोग्य पद्धतीने केलेल्या उच्चारमुळे, फक्त ऐकू येणारे आवाजच तयार होत नाहीत, तर त्यामुळे न ऐकू येणारी कंपने निर्माण होतात व ती कंपने मेंदूत व पाठीच्या कण्यामध्ये विशिष्ट स्नायूमार्ग (Neurological Pathways) तयार करतात.

[साभार संदर्भ आधार: Sanskrit, Whole Brain Learning and its Importance in the Super Accelerated Learning Theory (SALT) by Pandit Ramadheen Ramsamooj in Science and Technology in Ancient Indian Texts, Pages: 271–284]

इतक्या वैज्ञानिक पद्धतीने मुळाक्षरांची रचना व त्यांची मांडणी, प्राचीन भारतात केली याचाच अर्थ, त्याकाळी शरीररचनाशास्त्र (Anatomy), शरीरविज्ञानशास्त्र (Physiology), मज्जासंस्थाकार्य (Neurology) व मानसशास्त्र (Psychology) ह्या सर्व आरोग्य विषयांचा सखोल अभ्यास केलेला होता. अर्थात, त्यामागे, महर्षि पाणिणी, महर्षि पातंजली (पातंजल योगसुत्रे) यांच्या प्रचंड व प्रदीर्घ तपस्येचा व ज्ञानाचा भक्कम आधार असणारच.

आजही कित्येक हस्तलिखिते, शिलालेख व त्यासारखे दस्तऐवज जगात विखुरलेले आहेत व अजूनही त्यांचे वाचन, अध्ययन, चिंतन व विश्लेषण व्हाव्याचे आहे. कित्येक ग्रंथ हजारो वर्षापूर्वीच भारतातून चांगल्या व वाईट मार्गाने भारत बाहेर गेलेले आहेत. कैक शिलालेख अजूनही कुणीतरी वाचण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशी कित्येक साधने विस्मृतीत गेलेली आहेत. अगदी दूरच्या चीन सारख्या देशात कित्येक शतकापूर्वी नेलेले ग्रंथ आपल्याला महितही नाहीत. अति पूर्वेकडच्या देशात; जसे फिलिपाईन्स, चीन, इंडोनेशिया, कंबोडिया तर अगणित ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात विखुरलेले आहेत. वर उल्लेख केल्याप्रमाणे, पायथ्यागोरसचा सिद्धांत जो भारतात त्याच्या पूर्वी हजारो वर्षे बौदधायनाने सिद्ध केला होता तो भारत बाहेर जगाला माहिती नव्हता.

आपणा सर्वांचे हे आद्य राष्ट्रीय कर्तव्य आहे की, आपण स्वत: अशा प्रकारचे कार्य करावे तसेच इतरासही त्याकरिता प्रोत्साहित करावे. आपल्या पूर्वजांनी इतके अमाप व अगाध ज्ञान तयार केले असून स्वातंत्रयानंतर देखील त्याविषयी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्या गेलेले नाहीत. पाश्चिमात्य राष्ट्रांचाच उदोउदो आपण सगळे करत राहिलो. अजूनही वेळ गेलेली नाही. भविष्यातील भारत पुनः दैदीप्यमान बनविणे आपल्याच हातात आहे. ‘कृत्वा नवदृढ संकल्पम् |’ आजच्या या विज्ञान दिनी, आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपण सगळे जण आपल्या दैदीप्यमान प्राचीन सांस्कृतिक वारशाचे जतन करू, अभ्यास करू व त्याचा प्रचार व प्रसार करूया.

|| भारत माता की जय ||

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top