ईशवास्य उपनिषद हे अत्यंत गहन, अर्थपूर्ण व अथांग असे उपनिषद आहे. केवळ १८ श्लोक इतके लहान, पण अर्थाच्या दृष्टीकोणातून तितकेच मोठे आणि आ विश्वे व्यापून उरलेले उपनिषद. यजुर्वेदाच्या वाजसनेय संहितेमध्ये ईशवास्य उपनिषद आढळते. वाजसनेय संहितेमध्ये एकूण चाळीस अध्याय आहेत, त्यातील शेवटच्या अध्यायात हे उपनिषद आहे. या उपनिशदाचा मूळ व प्रमुख उद्देश हा परमेश्वराची विश्वातील एकात्मता आणि ‘असणे’ व ‘होणे’ (Being) या अत्यंत कठीण संकल्पना विदित करणे हा आहे.१
पद्यरूपात असूनही या उपनिषदाची मांडणी एखाद्या ग्रंथासारखी आंखीव व रेखीव आहे. पहिला मंत्र पूर्ण उपनिषदाचं सार असलेला बीजमंत्र आहे. त्याच्या पहिल्या ओळीत पूर्ण तत्वज्ञान सूत्ररूपात सांगून दुसऱ्या ओळीत, हे ज्ञान प्राप्त करून कसं जगावं, याच मार्गदर्शन आहे. दुसऱ्या मंत्रात कर्म करतच जागावं, हा उपदेश आहे, तर तिसऱ्या मंत्रात ज्ञान आणि कर्म दोन्हीकडे दुर्लक्ष करणाऱ्या आत्मघाती माणसांची काय गत होते, याचा निर्देश केलेला आहे.
नंतरच्या दोन मंत्रात पुन्हा ‘ईश’ ऐवजी ‘तत्’ (ते) हे सर्वनाम वापरुन पुन्हा त्याच थोड्या तपशिलात केलेल वर्णन-तत्वज्ञान आहे. पुढच्या दोन मंत्रात हे तत्वज्ञान आत्मसात करणाऱ्या व्यक्तिमध्ये काय परिवर्तन होऊ शकतं, त्या आदर्शाचा निर्देश आहे. आठव्या मंत्रात, ‘तत्’ आणि तत्वज्ञ याच एकत्रित वर्णन आहे.
पुढच्या नऊ ते चौदा या सहा मंत्रात तत्वज्ञान आत्मसात करणं आणि लौकिक जीवन यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहणे या दोन्हीत समन्वय साधण्यासाठी आवश्यकता स्पष्टपणे नमूद केलीय.
शेवटचे चार मंत्र म्हणजे म्हणजे वेगवेगळ्या स्तरांवरच्या चार प्रार्थना, प्रचिती, अंतर्मुख स्वगत आणि सामूहिक प्रार्थना अशा लरमान त्या येतात.२
भारताचे माजी राष्ट्रपति भारतरत्न डॉ. सर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी त्यांच्या ‘The Principal of Upanishdas’ या पुस्तकात, ईशवास्य उपनिषदावर लिहिताना, एका आंग्ल् कवी पालग्रेव्हच्या ‘गोल्डन ट्रेजर’ च्या एक खूप सुंदर व अर्थवाही कवितेचा उल्लेख केलेला आहे.३
“This man is freed from servile (submissive) bonds
Of hope to rise, or fear to fall;
Lord of himself, though not of lands
And having nothing, yet hath all.”
केवळ असण्याच्या कल्पनेवर स्थिर असलेले, परंतु नसण्याची जाणीव करून देणारे हे उपनिषद अलौकिक म्हटले पाहिजे. काय नाही व काय आहे, ह्याचा विचार करताना, काय करावयास हेवे व काय करायल नको हे जीवनाचे मूलगामी सुस्थिर तत्वज्ञान पहिल्याच श्लोकातील दोन ओळीत मांडलय, चपखलपणें. बहुधा यालाच ‘सुत्रबद्धता’ म्हणत असावे. आजच्या भाषेत आपण त्याला ‘कोडिंग’ (Coding) असे म्हणू शकतो. ह्या कोडला ‘क्रयक् (Crack)’ करण्याकरिता महासंगणकाची कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) देखील अपुरी पडेल, पण म्हणजे त्याला डिकोड (Decode) करताच येणार नाही असे म्हणायचे का आपण? याचे उत्तर आहे ‘नाही’. त्याला डिकोड करता येईल; फक्त आपल्याला, महर्षि पातंजलीनी, विभूतिपादामध्ये १७ व्या सूत्रात४ म्हटल्या प्रमाणे,
शब्दार्थ प्रत्ययानम् इतरे तराध्यासात संकरस्तत् विभाग संयमात सर्व भूतरुत ज्ञानम् ||१७||
असे केले असता, त्यापूर्वीच्या १६व्या श्लोकात म्हटल्या प्रमाणे,
परिणामत्रय संयमाद् इतितांन आगत ज्ञानम् ||१६||
संयमाच्या योगाने विशाल झालेली प्रज्ञा वर्तमानकालातून भूतकालात किंवा भविष्यकालात संचार करु शकते व पदार्थमात्राचे अतीत व अनागत धर्म प्रत्यक्षत्वाने जाणू शकते, किंवा हे धर्म ती प्रज्ञा जाणू शकते, ह्याचाच अर्थ ती अतीत व अनागत काळात जाऊ शकते. तर अशी ‘प्रज्ञा’ जागृत करावी लागेल. हे ऐकून खूप अवघड आहे असे वाटण्याची खूप शक्यता आहे; पण तसे नाही. अगदी सोप्या शब्दात सांगावयाचे तर, आर्ततेने ‘एकतरी ओवी अनुभवावी’ असा मनोमन शिवसंकल्प जर केला आणि योगेश्वर भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद् गीतेत अर्जुनाला सांगितल्याप्रमाणे ‘तू मला अनन्य भावाने शरण ये’ यावर दृढ विश्वास ठेऊन ‘न लिप्यते एवं त्वयि नान्यथेतोsस्ति न कर्म लिप्यते नरे’ या (श्लोक-२ रा) असा मनाचा दृढ संकल्प, ‘क्रूत्वा नव दृढ संकल्पम’ या भावनेने केला तर, मला असे वाटते कि, आपल्या मेंदूतील शतसहस्त्र ज्ञानतंतू निमिषात गतिमान करून, दीर्घ काळानंतर जसे आईला पाहिल्यावर हर्षपूर्ण बालकाप्रमाणें अतिशीघ्रतेने, भक्तीने भारीत होऊन, त्या ‘असण्याच्या’ अनुभवाकरीता मन अधीर होईल.
‘न लिप्यते नरे’ म्हणजे जसे श्रीमद् भगवदगीतेत भगवान श्रीकृष्णानी १२व्या अध्यायात, भक्तियोगात,५
‘अद्वेश्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च, निर्ममो निरहंकार: समदु:खसुख: क्षमी ||१३||’
जो जीवांचा द्वेष करीत नाही आणि सर्व जीवांचा सुहृद्य मित्र आहे, जो मिथ्या अहंकारपासून मुक्त आहे आणि स्वत:ला स्वामी समजत नाही, जो सुखदु:खामध्ये समभाव राखतो.
ज्ञानेश्वर महाराजानी १२ व्या अध्यायात भक्तीयोगात, या संदर्भात किती गोड लिहिले आहे६ ,
‘जो सर्व भूतांच्या ठायीं | द्वेषातें नेणेंचि कहीं | आपपरू नाहीं | चैतन्या जैसा ||४४|| उत्तमातें धरिजे | आधमातें अव्हेरिजे | हें कांहींच नेणिजे | वसुधा जेवीं | ||४५|| कां रायाचे देह चाळूं | रंका परौते गाळूं | हें न म्हनेचि कृपाळू | प्राणु पैं गा ||४६|| गाईची तृषा हरुं | कां व्याघ्रा विष होऊनि मारूं | ऐसे नेणेचि गा करूं | तोय जैसे ||४७|| तैसी आघवियांचि भूतमात्री | एकपणे जया मैत्री | क्रुपेसी धात्री | आपणचि जो | ||४८|| आणि मी हे भाष नेणे | माझे कांहींचि न म्हणें | सुखदु:ख जाणणें | नाहीं जया ||४९|| तेवींचि क्षमेलागीं | पृथ्वीसी पवाडु आंगी | संतोषा उत्संगी | दिधले घर ||१५०||
याची प्रचिती येण्याकरीता समर्थ रामदासस्वामिनी सार्थ दासबोधात आठव्या दशकात नवव्या समासात, सिद्धलक्षण सांगताना सिद्ध व ईश दोन्हीचे खूप छान वर्णन केलेले आहे.७
संदेहरहित साधन | तेचि सिद्धांचे लक्षण | अंतर्बाह्य समाधान | चळेना ऐसे ||१३|| अचळ जाली अंतरस्थिती | तेथे चळणास कैची गती | स्वरूपी लागता वृत्ती | स्वरुपाचि जाली ||१४|| मग तो चळताच अचळ | चंचळपणे निश्चळ | निश्चळ असोन चंचळ | देह त्याचा ||१५|| येथे कारण अंतरस्थिती | अंतरीच पाहिजे निवृत्ती | अंतर लागले भगवंती | तोचि साधु ||१७|| बाह्य भलतैसे असावे | परी अंतर स्वरूपी लागावे | लक्षण दिसती स्वभावे | साधुआंगी ||१८||
‘अनेजदकं मनसो जवीयो, नैनद्देवा आप्नुवन पूर्वमर्षत,
तद्धावतोs न्यानत्येति तिष्टत, तस्मिन्नपो मातरिश्वा दधति ||४||
सूक्ष्म हालचाल न करणार ‘ते’ एकच आहे. ते मनाहून वेगवान आहे. देवांच्या आधीच गतिमान झालेले ‘ते’ देवांनाही गाठता आलेल नाही. ते स्थिर आहे पण धावणाऱ्या इतर सर्वांना ओलांडून पुढे जातं. ‘ते’ आहे म्हणून मातरिश्वा पाणी-मूलद्रव्य धारण करतो (विश्वाची निर्मिती करतो).
एकदा का चित्त ‘ते’ कळण्याच्या अतीव ईछ्ने भरुन गेले की मग समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे ‘अचपल मन’ चपळपणे ‘ते’ पाहण्याकरिता, अनुभवण्याकरीता व कवेत घेऊन, आत्मसात करून अंत:स्थित होण्याकरिता धावेल. एकदा का अशा अवस्थेत पोहचलो की, त्यानंतर
‘तदेजति तनेजति तद्दुरे तद्वन्तिके, तद्न्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास बाह्यत: |’
हे दृश्यमान होऊ शकते. कसे असेल ‘ते’? कसे दिसेल ‘ते’? असे मूलगामी प्रश्न यक्ष प्रश्नाप्रमाणे समोर उभे ठाकणारच हे गृहीत धरायला हवे.
‘ते’ कसे असेल याचा एक द्रष्टान्त संतशिरोमणी ज्ञानेश्वर माऊली दिला आहे.
“कैशी स्वसुखाची अळुकी | जे दोनीपण मिळूनी एकी | नेदेतीच कव तुकी |एकपण फुटो ||”
स्व-सुख भोगण्याकरीता विश्वरूपानं ‘ते’ आपणच आपल्यापुढे येतं. आरशातील प्रतिबिंब (म्हणजे दृश) आणि ते पाहणारा (द्रष्टा) दोन वाटले, तरी वस्तुत: ते एकच असतात. आरशामुळे पाहणारा – द्रष्टा स्वत:च प्रतिबिंबरूपात पाहण्याचा विषय होतो !
त्यानंतर, आपण पोहचतो अशा ठिकाणी जे महाकाय अंतरिक्शाप्रमाणे व अथांग महासागराच्या अदृष्टवान विस्ताराप्रमाणें आहे. तिथे सगळे दिसते आणि तरीही काहीच दिसत नाही अशी विचित्र अवस्था होते; म्हणजे काय तर ‘स्थ’ म्हणजे राहणें, असणे (Being) आणि ‘अ’ म्हणजे नाही या अर्थाने ‘नसण्याची’ स्थिती (Nothingness or Void) पोकळी, जिथे आधारकरीता हातास काहीच लागत नाही. इतके असूनही त्या अनिर्वचणीय स्थितीत (Condition of Being) कदाचित अकल्पनीय व अनपेक्षित पूर्वस्थित सत्य समोर येईल.
‘यस्तु सर्वानी भूतानी, आत्मन्नेवानुपश्यती | सर्व भूतेषू चात्मानं, ततो न विजुगुप्तते ||६||
जो नेहमी स्वत:मध्येच सर्व भूतमात्रांना पाहतो आणि सर्व भूतमात्रांमध्ये स्वत:ला पाहतो, तो कशाचीही घृणा करत नाही. कुणाचाही तिरस्कार करत नाही. संपूर्ण जगच घडलेल आहे, म्हणजे ‘भूत’ या संकल्पनेत सर्वच येतं. फक्त ‘ते’ (तत्) नव्याने घडलेल नाही, ‘ते’ स्वयंभूपणें आधीपासून आहेच.
आधुनिक पदार्थ विज्ञानाने दाखवून दिलय, की सृजन-संहाराच संगीतनृत्य फक्त सजीव सृष्टीतच चालत आस नाही, तर निर्जीव (Inorganic) ‘द्रव्या ‘तही ते चाललेल असत. सब्एटोमिक पातळीवर प्रत्येक ‘कण’ हा केवळ सृजन-संहाराची प्रक्रिया असलेला ‘एनर्जी डान्स’ सादर करतो, अस नाही, तर तो स्वत:चं असएक ‘शक्ति-नृत्य’ असतो. डॉ फ्रिटजॉफ काप्रा यांनी त्यांच्या ‘The Tao of Physics’ या पुस्तकात८ असे म्हटले आहे, “For the modern physicists, then, Shiva’s dance is the dance of subatomic matter. The metaphor of the cosmic dance thus unifies ancient mythology, religious art and modern physics.”
पदार्थविज्ञानाच्या रूढ संकल्पना अशी आहे की, सूक्ष्म, भरीव, घन आणि अभेद्य असे मूलभूत कण हे विश्वाचे मुळभतू घटक आहेत, परंतु अलीकडे क्वांटम फिजिक्स (Quantum Physics) व त्यापुढी नव्या संकल्पनांमुळे ह्या संकल्पना कालबाह्य होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अर्नेस्ट रदरफोर्ड (३० ऑगस्ट १८७१–१९ ऑक्टोबर १९३७)९ हे न्यूझीलंड येथील फिजिसिस्ट होते. त्यांना न्यूक्लियर फिजिक्स चे जनक मानण्यात येते. त्यांना १९०८ साली त्यांच्या मूलद्रव्याचे विघटिकरण रेडिओएंकटीव्ह पदार्थाचे रसायनशास्त्र नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. त्यांनी किरणोत्सर्गातून मिळणाऱ्या अल्फा कणांचा वर्षाव अनुवर केला व त्या प्रयोगातून अनपेक्षित व धक्कादायक निष्कर्ष प्राप्त झाले. अणूच्या केंद्रस्थानी प्रोटॉन नावाचे धनभारीत कण व न्यूटॉंन हे भाररीत कण अस्तीत्वात असतात. ह्या केंद्रातील प्रोटॉयनचा धनभार (Positive Charge) संतुलित करण्यासाठी केंद्राच्या सभोवतालच्या पोकळीत इलेक्ट्रॉन (Electron) हे ऋणभारीत (Negatively Charged) वेगवेगळ्या स्तरावर व प्रवास करीत असतात. रुदरफोर्ड यांना नंतर असले लक्षात की, अणू कठीण आणि अभेद्य नसून त्यात पोकळी (Void) आहे. तसेच या पोकळीत असंख्य अतिसूक्ष्म\कण तरंगत असतात, फिरतात असतात. विशेष म्हणजे हे सूक्ष्म कणसुद्धा भरीव व मूलगामी नाहीत. ते कधी कणसारखे दिसतात तर कधी तरंगासारखे वाटतात. वास्तविकपणे त्या कणांचही अस्तित्व हे परस्परांमध्ये सतत घडणाऱ्या प्रक्रियांचे दृश्य स्वरूप आहे. कदाचित ते विभ्रमही असू शकतील. An elementary particle is not an independently existing unanalyzable outward to other things.१०
The tendency of particles to react too confinement with motion implies a fundamental ‘restlessness’ of matter, which is characteristics of the subatomic world. In this world, most of the material particles are bound to the molecular, atomic and nuclear structures, and therefore, are not at rest but have an inherent tendency to move about…they are intrinsically restless. According to quantum theory, matter is thus never quiescent, but always in a state of motions…..All the material objects in our environment are made of atoms which link up with each other in various ways to form an enormous variety of molecular structures, which are not rigid and motionless, but oscillate according to their temperatures and in harmony with the thermal vibrations of their environment.११
फोटॉन आणि गॉड पार्टिकल ह्या आधुनिक पदार्थ विज्ञानातील संकल्पनानी भारतीय तत्ववेत्यांनी हजारो वर्षापूर्वी मांडलेल्या संकल्पना ‘Quantum Physics’ च्या माध्यमातून स्विकारल्या आहेत व हेही मान्य केले की वरवर घनस्वरूप, स्थिर, न बदलणाऱ्या निर्जीव पदार्थांमध्ये सुद्धा आंतरिक हालचाली सतत होत असतात व त्यांचा वेग एका सेकंदाला ६०० किलोमीटर इतका असतो. रॉबर्ट ओपेनहायमर यांनी प्रॉबबिलिटी पॅटर्नमुळे पार्टिकल्स कुठेही, कसेही असू शकतात, नसूही शकतात.. या पार्टिकल्सच्या ‘टेंडन्सी’ संदर्भात म्हटल आहे, “If we ask, for instance, whether the position of the electron remains the same, we must say ‘no’, if we ask whether the electron’s position changes with time, we must say ‘no’, if we ask whether the electron is at rest, we must say ‘no’, if we ask whether it is in motion, we must say ‘no’.”
‘झेन बुद्धीझम’ मध्ये असे म्हणतात की, झेन गुरु सरळ व स्पष्टपणे काहीच शिकवत नाही, तर ते शिकविणे समस्यांच्या (Riddle) स्वरूपात असते, कारण झेन धर्मगुरूंचे असे म्हणणे आहे की प्रत्येकजण सक्षम आहे जगातील सर्व संकेताना समजण्याकरिता. Another analogy, without locality and non-locality, at least helps clarify implicate and explicate. I call you on the phone. The words emerge from my mouth as implicate unfolded sound-waves. The transmitter in my phone converts them to implicate or enfolded electrical charges. The receiver on your phone picks up these enfolded charges and unfolds them, so they become explicate sound-waves again, and you, ‘hear me talking’.
या प्रकारच्या ‘कोडिंग (Coding) – डिकोडिंग (Decoding)’ प्रत्यंतर पुढे काय झाले तर, The consequences of this implicate / explicate model seem even stranger than we suspect at first sight. For instance, just as Einstein’s Relativity abolished the dichotomy of ‘space’ and ‘time’, and modern psychosomatic medicine tends to abolish the distinction between ‘mind’ and ‘body’, this Bohm model seems to undermine dualism of ‘consciousness’ and ‘matter’. In a non-local implicate order, information cannot have a locality, but ‘permeates’ and /or ‘transcends’ all localities. And information that has no locality sounds a great deal like the Hindu divinity Brahma, the Chinese concept of Tao, Aldous Huxley’s ‘Mind At Large’ and ‘the Buddha-Mind’ of Mahayana Buddhism. Any one of those concepts must mean information without location (if we admit they mean anything at all.) The Buddha-Mind is not ‘God’, Buddhist continually explain, and Occidental blink, unable to understand religion without ‘God’, but Brahma, in Vedic Hinduism, does not have any of thee personality, locality, temperament (or gender) of Western ‘gods’ and, like Buddha-Mind, seems to mean a kind of non-local implicate order, or information without location, if it means anything.१२
In this connection, it will be worthwhile to refer to Psychokinesis based on/part of Para-Psychology. The Psychokinesis deals with activating the amazing power of human mind to influence the matter without any physical force to touch. This concept is well demonstrated in cinematographic way in the film from South Korea of the same name, ‘Psychokinesis’ (2018).
अर्थात मुद्दा असा आहे की, ‘मनाने’ दुसऱ्या ‘पदार्था’ स स्पर्श न करता प्रभावित करता येते का, त्या पदार्थास गतिमान करता येते का? उत्तर आहे ‘हो’. आपण ‘Hypnotism’ हयाविषयी ऐकलेले आहे, ज्यात मानसशास्त्रज्ञ व्यक्तीवर फक्त ध्वनीचा उपयोग करून त्याच्या मनावर ताबा मिळवतो. Psychokinesis मध्ये पदार्थाच्या अंतर्गत हालचालींशी (Internal Processes / Vibrations) संपर्क प्रस्थापित करून, ‘एकत्व शक्तीचा’ (Unified force & Energy) उपयोग करून हवी ती हालचाल त्या निर्जीव वस्तुद्वारा करून घेणे. प्रश्न असा उद्भवणारच की, हे कसे शक्य आहे. ईशावास्य उपनिषदामध्ये ‘अंतिम सत्य’ (Ultimate Reality) हेच सांगितले आहे की, आधीपासूनच ‘ते’ अस्तित्वात आहे. जे अस्तित्वात माझ्यात आहे तेच प्रत्येक पदार्थात आहे, किंबहुना सगळे एकच आहे.
आता जवळपास, आधुनिक विज्ञान हे भारतीय तत्वज्ञान च्या जवळ पोहचले आहे. डॉ काप्रा यांनी म्हटले आहे की, रॉबर्ट ओपेनहायमर यांचे वरील शब्द म्हणजे जणू ईशावास्य उपनिषदातल्या मंत्रच प्रतिध्वनी आहे.१३
It moves, it moves not
It is far, and it is near
It is within all this
And it is outside all this!
जणू काही आपण असे ऐकतो आहे कि,
“तदेजति तनैजति, तद्दुरे त द्वंतिके, तदंतरस्य सर्वस्य, तदु सर्वस्यास बाह्यत: ||५||”
आम्ही प्रार्थना करण्याच्या विकास-प्रक्रियेत शेवटचे मंत्रात ‘मी’ चं ‘आम्ही’ झालं आहे. पंधराव्या मंत्रात सत्यधर्मा अशा ‘मी’साठी प्रार्थना झाली, की सत्याच दर्शन हव आहे. त्यावरच सोन्याच आवरण दुर कर. सोळाव्या मंत्रात ‘दर्शन’ झालं. ‘तो मी आहे’, अशी प्रचिती आली. सतराव्या मंत्रात छोट्या ‘मी’ चं विसर्जन झालं. आता सर्वांसाठी प्रार्थना, सर्वानी मिळून करायची आहे. म्हणजे इथे ‘मी’ चं आम्ही झालोय (Dissolution & Transformation of Me).
ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिषयते ||
ॐ शांति: शांति: शांति:
संदर्भ:
१) The Principal Upanishad – Bharat Ratn Sir Sarvpalli Dr S Radhakrishnan, Page-565, HarperCollins Publishers India, Eighth Impression – 2000, Page – 565
ईशावास्यम् इदं सर्वम् – एक आकलन प्रवास – आसावरी काकडे, पृष्ठ क्रमांक ३९-४०, आवृत्ती – २०१२, पृष्ठ क्रमांक – ३९-४०
२) Ibid, PU, 566
३) भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन – योगाचार्य डॉ कृष्णाजी केशव कोल्हटकर, तृतीय आवृत्ती – २००७, पृष्ठ क्रमांक २३९
४) भगवद्गीता – जशी आहे तशी – कृष्णकृपामूर्ती श्री. श्रीमद् ए. सी. भक्तिवेदान्त स्वामी प्रभूपाद, २४ वे संस्करण २०१४, पृष्ठ क्रमांक – ४४८ -४४९
५) सार्थ ज्ञानेश्वरी, ब्रह्मीभूत वै. साखरे महाराज सांप्रदायिक शुद्ध सचित्र, १९९९, पृष्ठ क्रमांक – ४६२
६) सार्थ श्रीमत दासबोध, संपादन प्रा. के.वि. बेलसरे, समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड, सातारा. ११ वी आवृत्ती-१९९७, पृष्ठ क्रमांक – ४९८
७) The Tao of Physics, Dr Fritjof Capra, 3rd Edition, 137
८) अर्नेस्ट रुदरफोर्ड (https://hi.wikipedia.org/wiki/Ernest_Rutherford)
९) Ibid, 151
९) Ibid, 272
१०) Quantum Psychology, Robert Anton Wilcon, Page – 193 -194, New Falcon Publications, Las Vegas, Nevada, USA
११) Ibid, 167
१२) The Philosophy of Janadeo – As Glanced from the Amrutanubhav, Dr B.P. Bahirat, Motilal Banarsidas Publishers Pvt. Ltd., Delhi, Reprint-1998
१३) प्रकाशाच्या पायघड्या–ईशवास्य उपनिषद, सौ. मृणालिनी देसाई, विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग, पुणें, पुनर्मुद्रण- २०२०
१४) The Story of Philosophy, Will Durant