आज आदि शंकराचाऱ्यांची १२३३वी जयंती. महान व्यक्तींची जयंती व पुण्यतिथि साजरी करण्यापाठीमागे काय उद्देश आहे हे समजावून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. याबाबत महाभारतात, एक प्रसंग आहे. महाभारतात एक कथा आहे. ‘धर्माने’ युधिश्ठिराला प्रश्न विचारला कि, ‘कोणत्या मार्गाने जावे? (‘क: पंथा:?) त्यावेळी युधिश्ठिराने उत्तर दिले ते असे,
तर्कोऽप्रतिष्ठः श्रुतयो विभिन्ना नैको ऋषिर्यस्य मतं प्रमाणम्।
धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायाम् महाजनो येन गतः सः पन्थाः॥
(तर्कः अप्रतिष्ठः, श्रुतयः विभिन्नाः, एकः ऋषिः न यस्य मतं प्रमाणम्, धर्मस्य तत्त्वं गुहायाम् निहितं, महाजनः येन गतः सः पन्थाः।)
अर्थ: जीवन जगण्याचा उत्तम मार्ग कोणता याचा काही विशिष्ट मार्ग नाही. श्रुति (शास्त्र व अन्य मार्गही) वेगवेगळ्या गोष्टी करतात. असे कुणी ऋषि, चिंतक, विचारवंतही नाही कि, ज्यांचे म्हणणे प्रमाण मानल्या जाते. खरे तर धर्माचे मर्म खूप गूढ आहे. त्यामुळे, समाजांत सुप्रतिश्ठित लोक ज्या मार्गाने जातात त्या मार्गाचे अनुकरण करावे असा दंडक आहे. याचा अर्थ असा मुळीच नाही कि, त्या व्यक्ति ज्यांनी खूप संपत्ति मिळविली आहे, किंवा जे त्यांच्या व्यवसायात खूप यशस्वी झालेले आहेत, किंवा ज्यांच्याकडे काही प्रशासनाचे अधिकार आहेत. प्रतिष्ठित म्हणजे, जे म्हणजे जे चरित्रवान आहेत, जे त्यांच्या कर्तवव्याकडे दुर्लक्ष करीत नाहीत, जे दुसऱ्यांचा बाबतीत संवेदनशील आहेत, समाजाच्या हिताकरिता समर्पित आहे, इत्यादि.
मतीतार्थ असा कि, अशा काम करण्याच्या पद्धती किंवा तंत्र, ज्या सर्व सामान्यपणें मान्य आहेत, अनौपचारिकपणें ज्यांना प्रमाण मानल्या गेलेले आहे, ज्या वेळेच्या कसोटीवर सत्य व उत्कृष्ट ठरल्या आहेत. अशा गोष्टी खऱ्या तर् सामान्य बुद्धिमत्तेप्रमाणें अबाधित राहिलेल्या असतात.
या पार्श्वभूमीवर, ज्यांचे ‘अद्वैत तवतज्ञान’, आज बाराशे वर्षानंतरही अबाधित, सुप्रतिष्ठित आहे व जगभरांत त्याची प्रशंसा तर होत आहेच, पण त्याचे अनुकरणही होत आहे; आणि म्हणून, आदि शंकराचार्यांच्या १२३३ व्या जयंतीच्या निमित्ताने, त्यांच्या जीवनाकडे व त्यांनी हिंदू धर्माला, बौद्ध व जैंन धर्माच्या प्रसारानंतर पुनः एकदा सुप्रस्थापित करण्याचे जे महान कार्य केले त्याकडे एक दृष्टिक्षेप टाकणे हितावह तर ठरेलच, शिवाय तो एक राष्ट्रीय उद्घोषही ठरेल.
आदि शंकराचार्य भारतीय तत्वज्ञ व ब्रम्हज्ञानी होते. एकूणच भारतीय इतिहासाच्या कालनिर्णयाची समग्र आणि समाधानकारक चिकित्सा झालेली नसल्याने, जर्मन विचारवंत मॅक्स म्युलर व ए.बी. कीथ यांनी आद्य शंकराचार्यांचा जीवनकाल इ. स. ७८८ ते ८२० असा निर्धारित केला असून यास सर्वसाधारणपणे मान्यता ज्ञात येते.
केरळातील अलवाये शहरापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या चूर्णा नदीच्या काठावरील कालडी नावाच्या एक खेड्यात कृष्णयजुर्वेदीय तैत्तिरीय शाखेच्या नंपूतिरी (नंबुद्री) ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांच्या पित्याचे नांव शिवगुरू तर आईचे नांव आर्याम्बा होते. आचाऱ्यांच्या जीवनासंबंधी विश्वासार्ह माहिती देणारे ग्रंथ उपलब्ध नाहीत. केवळ ३२ वर्षांच्या छोट्याशा आयुष्यात त्यांनी प्रस्थानत्रयीवर परिपूर्ण भाष्ये, अनेकविध स्तोत्र रचना, भारतभर संचार करून चारही दिशांना केलेली मठांची स्थापना यासारख्या असाधारण कार्यामुळे आचार्य शंकराचा अवतार मानले जाउ लागले.१
आजच्या युगात असणाऱ्या प्रवासाच्या सोई पाहता, इतक्या लहान वयात संपूर्ण देशाचा प्रवास, त्यांनी एकदा नाही तर कितीतरी वेळा केला. याशिवाय १५० पेक्षा जास्त ग्रंथ लिहिलेत, स्त्रोत्रे रचलीत. कसे काय शक्य आहे हे सर्व अवघ्या ३२ वर्षाच्या आयुष्यात. पातंजल योगसुत्रात, योग साधनेच्या सहाय्याने हे शक्य आहे असा उल्लेख आहे. भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे, पुनर्जन्म आहे म्हणजेच पूर्वजन्मही आहे. त्यामुळे कदाचित, आद्य शंकराचार्य पूर्वीच्या जन्मात महान तपस्वी, योगी वगैरे असावेत व त्या जन्मातील तपश्च्यर्या अर्धवट राहिली व ते अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याकरिता त्यांनी शंकराचार्याचा जन्म घेतला असावा.
“This was Adi Shankaracharya, whose Advaita Vedanta was the philosophically robust response to that era of confusion, integrating diverse thoughts and Hindu practices into a philosophy based on the Vedica dictum of ‘One Truth, Many Expositions’. Advaita Vedanta is only one—and arguably the last…. of the six schools known as the ‘Six Systems’ (Shad Darshana) of mainstream Hindu philosophy, but it has proved the most enduring. Shankaracharya emphasized the importance of pramansa or methods of reasoning, tempered by anubhava or institutive experience, which empower the seeker to gain the spiritual knowledge adumbrated by the sacred texts. He focused on selected texts, the Bhagavat Gita, the Brahma Sutras and ten of the 108 Upanishads, as the key reference works of Hindu dharma, illuminating them through his bhashyas (commentaries)”.2
आदि शंकराचाऱ्यांची सर्वे भाष्ये ही गद्य स्वरूपात असून ती अत्यंत सुस्पष्ट, प्रसन्न व प्रासादिक आहेत. तसेच त्यांचे स्वरूप हे उपनिषदाप्रमाणे प्रश्न व उत्तर या स्वरूपातील आहे, ज्याला पाश्चिमात्य लोक ‘सॉक्रेटिक’ (Socratic) असे म्हणतात. त्यांच्या साहित्यात अत्यंत महत्वाचे एक म्हणजे ‘विवेकचुडामणी’ हा ग्रंथ आहे. त्यात एकूण ५८१ श्लोक आहेत. या ग्रंथात, त्यांनी उपनिषदापासून ते श्रीमद् भगवदगीतेपर्यंतच्या सर्व भारतीय तत्वज्ञानाचा परामर्श घेतला आहे. यात प्रामुख्याने, ‘वेदान्त शिकणाऱ्या विद्यार्थ्याकरिता आवश्यक पात्रता; जसे कि, खरे व खोटे यातील फरक करण्याची क्षमता, जगापासून अलिप्त राहण्याची मनोवृत्ति, संवेदनांना नियंत्रित ठेवण्याची क्षमता यांचा समावेश आहे.
त्यांनी चार महावाक्ये सांगितलीत, ‘प्रज्ञानम ब्रम्ह’ (ब्रह्माचे ज्ञान), ‘अयं आत्मा ब्रह्म:’ (आत्मा हाच ब्रह्म आहे), ‘तत्वमसी’ (तो तू आहेस) आणि ‘अहं ब्रम्हास्मी’ (मीच ब्रम्ह आहे), जी हिंदू धर्माची मार्गदर्शक तत्वे आहेत. या सर्वांच्या मागे, त्यांच्या अद्वैत तत्वज्ञाचा मूळ स्त्रोत आहे. “अंतस्थ अविनाशी आत्मा (आत्मन) आणि सर्वशक्तिमान वैश्विक शक्ति, ब्रह्म हे खरोखर एक व तेच आहेत. सांख्य तत्वज्ञानाप्रमाणे, आत्मा व ब्रह्म हे दोन आहेत; परंतु शंकराचार्यांनी त्यास असे प्रतिउत्तर दिले कि, ‘निरीक्षणाच्या पातळीवर ते जरी दोन भासत असले, तरी तो भास किंवा भ्रम आहे. ब्रम्हन, याने संपूर्ण विश्वाला व्यापले आहे हे खरे सत्य आहे; याशिवाय इतर सर्व, विश्व, पदार्थ आणि मनुष्यप्राणी हे सतत बदलणारे, क्षणिक व भ्रामक आहेत (माया). ब्रह्माचे खरे स्वरूप हे ‘सत्-चित-आनंद’ (Truth-Consciousness-Bliss) हेच आहे.’ शंकराचार्यांनी त्यांच्या ‘उपदेशशास्त्री’ यात:
“I am other than name, form and action.
My nature is ever free!
I am Self, the supreme unconditioned Brahman.
I am pure Awareness, always non-dual.” [उपदेशशास्त्री: ११.७]
शंकराचाऱ्यांच्या हिंदू तत्वज्ञानाप्रमाणें, ‘देव् हा काही विश्वापेक्षा वेगळा नाही. देव् हा विश्वातच वसलेला आहे. तो विश्वात आहे आणि त्यापलीकडेही आहे.’ हा वारसा यजुर्वेदातील ईशवास्यउपनिषदात आहे. तो असा,
‘ईशा वास्यमिदं सर्वं यत्किंचिंत जगत्यां जगत् | तें
न त्यक्तेन भुंजीता मा गृध: कस्यस्विद्धनद्म् ||१||’
अर्थात, या पृथिवीत जें काही जगत् आहे, ते हे सर्व ईश्वराने आच्छादित करावे. (परमार्थ सतीरूपणे हे सर्व चराचर झाकून टाकावे. सर्वविकारजात आत्मरूप आहे, अशी भावना करावी. तशी भावना केली असता हे सर्व सोडल्यासारखे होते. त्या त्यागाने तू आपले पालन कर.
शंकराचार्यानी असेही म्हटले आहे कि, आत्मज्ञान होण्याकरीता मन:शुद्धी आवश्यक आहे, व त्याकरिता धर्मसंमत जीवन पद्धती (Ethical behaviour) असावयास पाहिजे, म्हणजे आयुष्यात अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह ह्या तत्वांचे पालन व्हावयास पाहिजे.
अद्वैत तत्वज्ञानाने, ‘एकत्व’ (Oneness) ह्या तत्वास मांडून ‘सर्व मानवात समानता’ हे तत्वज्ञानाचे महान तत्व मांडले आहे. जसे, श्वेतश्वेतातर उपनिषदात म्हटले आहे,
‘Without beginning and end is He, in the midst
Of chaos is He, and brings forth all things. Creator
Is he, and sole pervade, of manifold forms’.
When a man knows God, he is freed from all fetters.” Svetashvatara Upnishad, V.13.2.
ही कल्पना अगदी सुस्पष्टपणें ‘निर्वाणषट्कम्’ या स्त्रोतात मांडली आहे.
“मनोबुदध्यहंकारचित्तानि नाहं, नच श्रोत्रजिण्हेरो न च घ्राणनेत्रे |
न च व्योम भूमिर्न तेजो न वायुश्चिदानंदरूप: शिवोsहं शिवोsहम् ||१||
I am not the Mind, nor the Intellect, nor the Ego, nor the Material of the Mind;
I am not the body, nor the changes of the body;
I am not the senses of hearing, taste, smell, or sight,
Nor am I ether, the earth, the fire, the air;
I am Existence Absolute, Knowledge Absolute, Bliss Absolute….
I am Shiva, I am Shiva (Shivoham, Shivoham)
यात पुढे म्हटले आहे त्यावरुन, आत्म्याचे स्वरूप हे अतितरल, सर्वव्यापी, व सर्व विकारांच्या पलिकडे असे आहे, जे खालील निर्वाणषट्काच्या शेवटच्या श्लोकात स्पष्टपणे मांडले आहे.
“अहं निर्विकल्पो निराकार रुपो, विभूत्वाच्च सर्वत्र सर्वेन्रिे याणाम् |
न चासंगतं नैव मुक्तिर्न मेयश्चिदानंदरूप: शिवोsहं शिवोsहम् ||६||
I am untouched by the senses, I am neither Mukti nor knowable;
I am without form, without limit, beyond space, beyond time;
I am in everything; I am the basis of the universe; everywhere am I.
I am Existence Absolute, Knowledge Absolute, Bliss Absolute….
I am Shiva, I am Shiva. (Shivoham, Shivoham). || निर्वाणशट्कम् ||३
आठव्या वर्षी चारही वेदांचे अध्ययन, बाराव्या वर्षी सर्व शास्त्रांचे ज्ञान, सोळाव्या वर्षी प्रस्थानत्रयीवर भाष्य व बत्तिसाव्या वर्षी महाप्रस्थान! सर्व अलौकिकच ! वयाच्या आठव्या वर्षीच बालशंकराच्या मनात सन्यासाचा विचार प्रबळ जल, पण विधवा आर्याम्बा म्हातारपणाचा एकमेव आधार असलेल्या एकुलत्या एक मुलाला संन्यास घेण्यास अनुमती देइना. यानंतर एक चमत्कार घडला. नदीत स्नानासाठी उतरलेल्या शंकराचा पी मगरीने पकडल. संन्यासाला अनुमती दिल्यासच मगर पाय सोडेल, असे शंकराने सांगितल्यावर पुत्राच्या जीवनसाठी माटेने अखेर संन्यासाला संमती दिली. सांसारच्या मगरमिठीतून पाय सोडवून घेऊन बालब्रम्हचारी शंकर, गुरुशोधार्थ बाहेर पडला तो थेट नरमदेच्या तीरावर तपश्चर्या करणाऱ्या गौडपादाचाऱ्यांच्या गोविंदभगवत्पाद या शिष्याच्या पायाशी जाऊन पोहचला. कर्ममार्गी मंडणमिश्र यांना वादात जिंकून आचार्यांनी ज्ञानमार्गाकडे वळविले, व ह्याच मंडमिश्रांनी सुरेश्वराचार्य या नावाने ‘नैष्कर्म्यसिद्धी’ व ‘बृहदारण्यकवार्तिक’ असे महत्वाचे ग्रंथ लिहिले.
ऋग्वेदापासून प्रारंभ होऊन अथर्ववेदांतील सुक्तांच्याद्वारे उपनिषदांत परिपूर्ण रितीने परिणत झालेल्या ब्रम्हात्मैक्य तत्वाचे प्रतिपादन आणि उपनिषद वाक्यातील आपापत: आढळणार्या विरोधांचा परिहार करून, त्यांचा तर्कदृष्ट्या समन्वय घालून व सांख्य-योग, न्याय-वैशेषिक, पूर्वमीमांसा अशा आस्तिक व बौद्ध, जैन, लोकायतन अशा नास्तिक दर्शनांचे पद्धतशीरपणे खंडन करून केवलाद्वैत तत्वज्ञानाची भक्कम पायावर मांडणी करणे, हे आचार्यांचे सर्वात मोठे योगदान आहे. देशभर परिभ्रमण करून आचार्यांनी बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी व श्रुंगेरी असे चारही दिशांना मठ स्थापन करून व तेथे अधिकारी पिठाधीशांना नेमून आपल्या तत्वज्ञानाची परंपरा अखंड चालू ठेवण्याची व्यवस्था केली. या चार मठाव्यतिरिक्त काशीचा सुमेर मठ तथा कांचीचे कामकोटीपीठ यांचीही त्यांनी स्थापना केली.
वैदिक संस्कृतीमधून विकसित होत गेलेला व काळानुसार बदलत गेलेला धर्म पुढे ‘हिंदूधर्म’ म्हणून ओळखला जाऊ लागला, असे मत सर्वसामान्यपणे मांडले जाते. या धर्मातील विषमाधिष्टित चातुर्वण्य, हिंसायुक्त यज्ञ, अनेकतावाद या विविध कारणांमुळे जैंन, बौद्ध, पांचरात्र, भागवत अशा प्रकारच्या चळवळी निर्माण झाल्या व लोकांचा ओढा या चलवळींकडे वळला. तत्कालीन आदित्य, अंबिका, विष्णु, गणनाथ आणि महेश्वर या पांच लोकप्रिय देवतांची एकत्र पूजा करण्याचा समन्वयी मार्ग ‘पंचायतन पूजे’ च्या द्वारा आचार्यांनी दाखवून दिला. हिंदू मनात मंदिराविषयी असलेली श्रद्धा जाणून आचार्यानी भारतातील बहुतेक प्रमुख मंदिराना भेट देऊन तेथील पूजापद्धतीत शुचित्व आणले.१
मला वाटते जगाच्या आतापर्यंतच्या इतिहासात बहुधा हे फक्त दुसरे उदाहरण (संत ज्ञानेश्वरा नंतर) असेल, ज्यात इतक्या लहान वयात इतकी ग्रंथ रचना (१५० पेक्षा जास्त) व इतका प्रचंड प्रवास केलेला आहे.
आद्य शंकरचाऱ्यांच्या सर्व स्तोत्रांचे एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व स्तोत्रे अत्यंत गेय आहेत. त्या सर्वात एक मधुर असा ध्वनि स्तोत्र म्हणताना निर्माण होतो. कदाचित, ज्याप्रमाणे, वेद वाङमय सुत्रबद्ध आहे, त्याचप्रमाणें, त्या स्तोत्रात ज्ञानाशिवाय, संगीताच्या माध्यमातून एखादा विशिष्ट परिणाम साधण्याचे गूढ तंत्र लपलेले असावे. ती सर्व स्तोत्रे म्हणतांना जो ताल / ठेका (Rhythm) आपसूकच धरल्या जातो, तो सुद्धा अलौकिकच वाटतो. त्या सर्व स्तोत्रांतील शब्द हे वाच्यार्थाने, लक्ष्यार्थाने व व्यंजार्थाने अतिशय प्रभावशाली आहेत. शब्दांच्या सगळ्या शक्ति त्या स्तोत्रातून प्रतीत होतात. आदि शंकराचार्यांच्या व्याकरण व संगीतशास्त्राच्या विस्तृत ज्ञानाचे प्रत्यंतर त्यांची स्तोत्रे म्हणतांना येते. ध्वनिशास्त्राचा सुद्धा त्यांचा गाढा अभ्यास असावा याची प्रचिती त्यांच्या स्तोत्रामधून येते. त्यांनी योजिलेले शब्द प्रासादिक, अर्थपूर्ण, लयबद्ध, कर्णमधुर व अतिशय अर्थगर्भित आहेत. ‘चर्पटपंजरीकास्तोत्र’, ‘नर्मदाश्टकम्’ ही दोन स्तोत्रे तर अतिशय सुंदर अशी स्तोत्रे आहेत.
आजच्या जगात व विशेषकरून भारतात, समानता व सर्वांप्रति प्रेम ह्या दोन गोष्टींचा प्रचंड अभाव आहे, ज्यामुळे, विविध कारणांवरून आपापसात भेद, मतभेद व भांडणे होतात. ‘आत्मन’ व ‘ब्रह्मन्’ यातील एकात्मतता, जी आदि शंकराचर्यानी त्यांच्या ‘अद्वैत वेदान्त’ तत्वज्ञानातून मांडली तिचा योग्य, अचूक व अभिप्रेत अर्थ समजावून घेऊन सर्वानी आपल्या आयुष्याची दिशा, ध्येय व आपली वर्तणूक ठरविली व त्या प्रमाणे खरोखरच वागणूक ठेवली तर, भारतीय समाजाचे चित्र बदलून जाईल व एक नवा समाज स्वरूप आपल्याला पहावयास मिळेल; ज्याकडे सर्व जग एक आदर्श [Model, Role Model or Standard Bench-Mark] म्हणून पाहील. प्राचीन काळात, परदेशी प्रवासी भारतात येऊन शिकत असत व त्यांनी त्याचे उल्लेख, जसे फाहेन, मेगस्थिनीस यानी लिहून ठेवलेले आहे. तशाच प्रकारे, भविष्यातसुद्धा, दुसऱ्या देशातून लोक इथे स्वस्थ, शांत व सुस्थापित समाजाचा अभ्यास करण्याकरिता येतील यात मला मुळीच शंका नाही.
‘शंकरस्य महामुन्यो ज्ञानोमहर्षि सत्यवान, तस्य स्मरण मात्रेन, ज्ञानम् सत्यंच प्राप्यते |’
संदर्भ:
१) मराठी ज्ञानकोश, https://vishwakosh.marathi.gov.in/
२) ‘Adi Shankara’ from book titled as ‘The Hindu Way – An Introduction to Hinduism’ by Shashi Tharoor, Page-142, Edition-2019.
३) स्वाध्याय सुद्धा, गुरुदेव सिद्ध्पीठ, गणेशपुरी, जि. ठाणे (महाराष्ट्र), ११ वी आवृत्ती, १९९०, पृष्ठ क्रमांक – ७९
४) Historical Dictionary of India, Surjit Mansingh, Vision Books, Bombay, ISBN 81-709-309-
५) भारतीय तत्वज्ञान, श्रीनिवास दीक्षित, पाचवी आवृत्ती – १९९०
६) World Religions – An Encyclopaedic Reference for Religions
अप्रतिम विश्लेषण.