चला चला आबा, हिमाचलला जाऊ,
चांदीचे छान छान, डोंगर खूप पाहू………….
चला चला आबा, गोव्याला जाऊ,
समुद्राचे निळे, पाणी आपण पाहू…….
चला चला आबा, जैसलमेरला जाऊ,
वाळूचे पिवळे, डोंगर आपण पाहू……
चला चला आबा, छत्तीसगडला जाऊ,
खूप खूप दाट, जंगल आपण पाहू…….
चला चला आबा, दार्जिलिंगला जाऊ,
सोन्याचा डोंगर, कांचनगंगा पाऊ……
चला चला आबा, कन्याकुमारीला जाऊ,
तीन तीन समुद्र, एकत्र आपण पाहू……
चला चला आबा, मेघालयला जाऊ,
धुक्यांच्या पावसात, चिंबचिंब होऊ…….
आता खूप फिरलो, थोडे आपण थांबू,
थोडेसे पत्ते, क्यारम आपण खेळू………..
खूप दिवस झाले आबा, अभ्यास नाही केला,
बुद्धीबळाचा डाव, तोही नाही झाला………..
आबा आता आणा, एक नवी नवी कार,
पहायला जाऊ, शेते हिरवीगार………………..
तुमचा मी चिंपु, आबा तुम्ही माझे,
गम्मतजम्मत करू, तुम्ही फक्त माझे………….
मुकुंद भालेराव@83088 35313