अलक (अत्यंत लघुकथा)

रिझल्ट

आजोबांची झोपयाची वेळ झाली आणि तितक्यात नातू आला व त्याने विचारले, “रिझल्ट काय?”
“कधी झाली तुझी परीक्षा?” आजोबा
त्याचा पुन्हा तोच प्रश्न आजोबांकडे बोट दाखवत.
आजोबा, “अच्छा, एम ए चा…..अजून लागला नाही.”
आता त्याने त्याचे बोट आजोबांकडे निर्देशित करून स्वत:च्या हृदयाकडे नेत विचारले, “हार्टचा रिझल्ट?”
आजोबा उत्तरले, “एकदम ओक्के…”
त्याच्या चेहऱ्यावर एकदम आनंद व शांती पसरली.

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top