Marathi

पवारांची आरती….

मला कल्पना आहे कि, वरील शिर्षक वाचुन बर्याच लोकांनी बरेच तर्क काढले असतील एव्हाना. येथे ‘आरती’ हा शब्द विशेष नाम (Proper Name) म्हणून वापरलेला नाही, तर सामान्य नाम(Common Name) म्हणून वापरला आहे. आपण नाही का बोलभाषेत म्हणतो ‘ती पाटलांची सई हो, ती जोश्यांची उमा हो, ती कुळकर्ण्यांची राधा हो’, तसे इथे मुळीच अभिप्रेत नाही बर कां. म्हणजे पवारांची आरती नावाची मुलगी वगैरे नाही. त्यामुळे उगाचच वेगळे अर्थ काढू नये व वाद निर्माण करू नये.

आरती हा शब्द येथे ‘आरती ओवाळणे’ याकरिता उपयोगात आणला आहे. मला या गोष्टीचे आश्चर्य वाटते कि, जवळपास सगळे मिडीयावाले सदानकदा दोनच व्यक्तींच्या मागे का फिरतात, एक म्हणजे महाप्रवक्ते व दुसरे म्हणजे ज्यांना लोक ‘जाणते’ असे अजाणतेपणे म्हणतात ते! बघा ना त्या खर्या जाणत्या राजाविषयी, आयुष्यभर ज्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात दर्याखोर्यात जमेल तशी भटकंती करून दस्तऐवज पाहून, तपासुन ‘राजा शिवछत्रपती’ हा दशखंडात्मक ग्रंथ लिहिला त्या आदरणीय स्व. बाबासाहेव पुरंदरेना खोटे पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या ह्या तथाकथित ‘जाणत्या’ ची आरती लोक का ओवाळत आहेत रात्रंदिवस? कशाकरिता? काय असे दिव्य काम केले त्यांनी? काहीही नाही. आयुष्यभर निष्ठा बदलत राहिले, अगदी स्व. यशवंतराव चव्हाणापासून तर आत्ता आत्ताच्या स्व. राजीव गांधी, श्रीमती सोनिया गांधी पर्यंत. असो.

माझा मुद्दा वेगळा आहे. केंद्रीय मंत्री असताना किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कोणते लक्षात राहील असे काम केले त्यांनी. मला तर काही आठवत नाही. यांचा जो कांही तथाकथित प्रभाव आहे तो तसा अहमदनगर-पुणे सोडला तर अपवादानेच दिसून येतो; नाही म्हणायला शिक्षणसम्राट श्री कमलकिशोर कदम (महात्मा गांधी मिशन, नांदेड व औरंगाबाद), स्व. पतंगराव कदम (भारती विद्यापीठ, सांगली व पुणे), श्री. अनिल देशमुख (नागपूर), श्री दत्ता मेघे (दत्ता मेघे इंस्टीट्युट, नागपूर व वर्धा) ह्याच्या रुपात आहेत थोडेसे.

नुकतेच निवडणूक आयोगाने यांचे जे वस्त्रहरण केले ते तर उरलीसुरली प्रतिष्ठा धुळीस मिळविणारे आहे. हां, नावापुरता ‘राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष’! ह्यांच्या नावात फक्त ‘राष्ट्र’ आहे, बाकी सर्व वाद व वादग्रस्तच. देशविरोधी कृत्यांकारिता कारागृहात खितपत पडलेले यांचे सहकारी, ज्यांच्याकरिता यांनी दिल्लीत जाऊन पत्रकार परिषद घेतली व न्यायालयाच्या आधीच त्यांचे निर्दोषत्व जाहीरसुद्धा करून टाकले, त्यांना बरोबर घेऊन सरकार चालविण्याचा प्रयत्न केला हे मात्र खरे. खरे तर ते कितीही ज्येष्ठ (!!) व श्रेष्ठ (??) नेते असले तरी आता वयानुसार व प्रकृतीनुसार त्यांनी किमान वानप्रस्थ आश्रम तरी स्विकारायला हवा. (सन्यास, याकरिता म्हटलेलं नाही कि, ती एकदम अशक्य कोटीतील गोष्ट आहे त्यांच्याकरिता. त्याकरिता खूप मोठी मनाची तयारी असावी लागते, करावी लागते; आणि तेवढी करण्याची यांची क्षमता आहे कि नाही हा मोठच प्रश्न आहे. इच्छा तर मुळीच नाही हे तर स्पष्टच आहे.) आदी शंकराचार्यांनी जवळपास दोन हजार वर्षापूर्वी (इसवीसनपूर्व ५०९–ते इसवीसनपूर्व ४७७) ‘चर्पटपंजरिका’ नावाचे स्तोत्र लिहिले. त्यात ते म्हणतात,
अंगं गलीतं पलीतं मुंन्डम्
दशविहीनं जातम् तुंडम्
वृद्धो याती गृहीत्वा दंडम्
तदपि न मुन्च्यती आशा पिंडम् ||
भज गोविन्दम भज गोविन्दम
भज गीविन्द्म मूढमते ……
अंग थरथर कापायले लागते, मान पण कंप पावते, अस्थिर होते, चालताना काठीचा (किंवा कुणाचा) तरी आधार लागतो, तोंडातील दात पडून गेले तरीही आशा कांही सुटत नाही. ‘आशा नाम मनुष्यानां|’ दुसरे काय!

मला त्यांच्या किंवा कुणाच्याही शारीरिक व्यंगावर बोलावयाचे नाही, कारण तसे कुणालाही होऊ शकते, परंतु, वार्धक्य अवस्थेत मात्र जेव्हा निर्णय क्षमता कमकुवत होते, तेंव्हा फारतर आपले निर्णय आपण घ्यावेत, दुसर्याचे नाही. खरे तर आरोग्यशास्त्राप्रमाणे, कायद्याप्रमाणे व मानसशास्त्राप्रमाणे खूप जास्त वय झाल्यानंतर स्वत:चे निर्णय देखील स्वत: घेण्याची क्षमता शिल्लक राहत नाही.

कुठल्याही सामाजिक वा राजकीय कामात ‘निर्णय-प्रक्रिया’ खूप महत्वाची असते व त्याकरिता मेंदू व बुद्धी सदैव तल्लख असायलाच हवी. जर का मेंदू व बुद्धी क्षीण झाली असेल तर त्याचा विपरीत परिणाम निर्णय प्रक्रियेवर हमखास होतो. आयुष्याच्या शेवटपर्यंत काम करणे आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग असणे ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वरिष्ठ व अनुभवी कार्यकर्त्यांनी नवीन कार्यकर्त्यांना सल्ला जरूर द्यावा व मार्गदर्शन करावे, परंतु त्यांनी निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ नये. वय वाढलेल्या व ज्यांची मेंदूची क्षमता शिथिल झालेली आहे, त्यांनी अगदी जाणीवपूर्वक निर्णय प्रक्रियेपासून स्वत:ला दूर ठेवावे, दूर रहावे.

दुसर्या जागतिक महायुद्धापूर्वी अमेरीकीचे अध्यक्ष फ्र्यान्क्लीन डी रुझवेल्ट यांची प्रकृती चांगली होती, काही किरकोळ तक्रारी सोडल्या तर, परंतु त्या महायुद्धाच्या दरम्यान त्यांची प्रकृती खालावली. जागतिक युद्ध संपल्यानंतर, क्यासाब्लांका, मास्को, तेहेरान, माल्टा इत्यादी ठिकणी संमेलने झालीरूझवेल्ट सहभागी झालेत. त्या संमेलनात, तेंव्हा रूझवेल्टचा स्वीय सचिव हजर होता. त्याच्या म्हणण्यानुसार, जर रुझ्वेल्टची प्रकृती चांगली असती तर त्यांनी पूर्व युरोपचा इतका मोठा भाग स्त्यालीनला दिला नसता. ती घोडचूक केवळ रुझ्वेल्टच्या शारीरिक व मानसिक दौर्बल्यामुळेच घडली असे त्याने म्हटले आहे.

इसवी सन १८७९ च्या फ्र्यान्को-रशियन (France-Russian) युद्धाचे वेळी, फ्रान्सचा राजा शारीरिक दृष्ट्या अत्यंत दुबळा झालेला होता; त्यामुळे, त्याचे सर्व अधिकार त्याच्या पत्नीकडे गेले. परिणामत: पर्शियन सैन्याने प्यारीस काबीज केले व राजाला तुरुंगात टाकले. अशीच गत इराणमध्ये रेझाशहा याची झाली. त्याच्या आजारीपणामुळे, त्याची निर्णय क्षमता नष्ट झाली होती व त्यामुळे तो देशाचा राज्यकारभार चालविण्यास असमर्थ झाला होता, तसेच राणीच्या हुकुमशाही प्रवृत्तीमुळे राजाला इराण सोडून पळून जावे लागेल होते.

अशाच प्रकारची घटना चीनमध्ये झाली. माओत्सेतुंग हे त्यांच्या आयुष्याच्या शेवटी शेवटी मानसिक दृष्ट्या खूप आजारी असतांना त्यांची चौथी पत्नी जियांग किन (जी एक तरुण अभिनेत्री होती.) तिच्यावर पुर्णपण विसंबुन राहिल्यामुळे त्यांचा पराभव झाला.

कुठल्याही संस्थेत कुठ्ल्याही कार्यकर्त्याने आजीवन काम करण्यास कांहीच हरकत नाही, परंतु जर कार्यकर्त्याची शारीरिक अवस्था चांगली नसेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्याच्या मानसिक स्थितीवर निश्चीतच होतो, आणि म्हणून त्याने निर्णय प्रक्रियेत मात्र सहभागी होऊ नये, तर त्या पासून दूरचा रहावे. आयुष्यभर कमाविलेल्या अनुभवाचा उपयोग त्या कार्यकर्त्याने तुलनात्मक दृष्ट्या तरुण असणार्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता करावा व स्वत: निर्णय प्रक्रीयेपासून दूर राहावे. पण सत्तेचा मोह हा दारूच्या नशेपेक्षाही भयंकर असतो आणि म्हणून ती सत्ता काबीज करुन आपल्या सतत हातात ठेवण्याकरिता काय वाट्टेल ते करण्याची राजकारण्यांची तयारी असते.

आता कुणी म्हणेल कि, मला काय करायचे? का मी अशी हरकत घेत आहे. माझा प्रश्न आहे कि, का नाही घ्यायची हरकत? मी एक स्वतंत्र भारताचा नागरिक आहे. ह्या देशात व समाजात जर अशा प्रकारे शारीरिक दृष्ट्या अक्षम व दुर्बल लोक समाजाचे नेतृत्व करत असतील तर त्याचा विपरीत परिणाम समाजावर होणारच व त्या समाजाचा मी घटक असल्यामुळे त्या अयोग्य निर्णयाचा परिणाम माझ्यावर होणारच कि. अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे झाल्यास, २०१९ च्या विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर, ह्याच श्री शरदचंद्र पवारांनी जाहीरपणे असे विधान केले होते कि, आम्हाला (म्हणजे त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाला) विरोधी बाकावर बसण्याचा कौल जनतेने दिलेला आहे, त्यामुळे ते सरकार बनविण्याचा प्रयत्न करणार नाही, पण झाले काय? तर अनैसर्गिक गुणधर्म असूनही लोकशाही विरोधी राजकीय पक्ष एकत्र येऊन केवळ सत्ता हस्तगत करण्याकरिता हात मिळवणी केली. ज्या कांग्रेस पक्षाची साथ केवळ त्या पक्षाचे नेतृत्व एक जन्माने अभारतीय व्यक्ती करत आहे म्हणून सोडली होती, त्याच पक्षाबरोबर पुन्हा घरोबा केला. जसे एका पत्नीबरोबर घटस्फोट घ्यायचा व पुन्हा त्याच पत्नीबरोबर संसार करायला जायचे. ज्या शिवसेना पक्षाने सुरुवातीपासून ज्यांना ज्यांना विरोध केला त्याच सर्वांबरोबर घरोबा केला. कशाकरिता? फार मोठा उद्देश होता का? राष्ट्रीय उद्दिष्ट होते काय? मुळीच नाही.

आता वर उल्लेखिलेल्या इतिहासातील उदाहर्णांकडे एक संदर्भ म्हणून जर आपण पाहिले तर असे म्हणण्यास बराच वाव आहे कि २०१९ ते २०२२ या कालावधीत अनेक चुकीच्या गोष्टी महाराष्ट्रात घडल्यात. मग त्यात करोना सेन्टरच्या बाबतीत घडलेला घोटाळा असेल किंवा इतर कांही. शेवटी जे कांही पैसे त्यात हडप केल्या गेले, ते तर महाराष्ट्रातील जनतेचे होते नां, म्हणजे माझेही पैसे त्यात गेले नां! जर का असे नेतृत्व सत्तेपासून दूर असते, तर कदाचित ते तसले गैरप्रकार घडलेच नसते. तुमच्यापैकी सर्वांनी दुरदर्शनवर चालतांना त्यांना कसा सारखा कुणाचा आधार घेऊन चालावे लागते हे पाहिलेच आहे. असेच काहीसे भूतकाळात स्व. श्री. मुलायमसिंग यादव व श्री. लालूप्रसाद यादव यांच्या बाबतीत देखील होते. महाराष्ट्रातील उदाहरण केवळ एवढ्याचकरिता घेतले कि महाराष्ट्रातील घटना सर्वसामान्यपणे महाराष्ट्रातील सर्वांना माहीत असतात.

यावरून सहज एक शेर आठवला.
तुम्हारी बेनियाजी ने मुझे बीमार कर डाला
तवज्जोह कि नजर हो तो मै सेहतयाब हो जाऊ |
……..खलिश कादरी
तुझ्या निस्पृहतेने मला आजारी करून टाकले, तू माझ्याकडे कृपाकटाक्ष टाकलास तर माझा आजार बरा होईल. अर्थात या शेरमधील पहिलेच वाक्य लागू पडते, दुसरे मुळीच नाही.
अगदी किती लागू पडते ना हे! मला नाही वाटत याचे जास्ती स्पष्टीकरण देण्याची गरज आहे.

Before I conclude this, I want to state that when you are misusing the position granted to you by society, overlooking your ability, physical, emotional and intellectual, you are wiping out your own contribution made; with a sole intention to remain in limelight, permanently. We have seen famous actors and actresses adopting themselves to different roels, inlcuding the character roles, which are befitting to their advanced age, physical appearence etc. We have also seen the disasterous consequesnce faced by Late Rajesh Khanna, who once ruled the silver screen and maddened the generation of that time; but what happend later. He carreid away with his fame, publicity and charisma, which was once influencing and enchanting the audience a lot, but he did not relaised it in time, though he accepted it later in one public program. However, another legendary actor, Dev Anand, in his life changed with time and turned towards direciting films. It indicates that those who change and and adopt themselves with the changed situation and time only succeed in real sense. ‘महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती.’

असो, देव त्यांना व तशा इतरांना तर्कसुसंगत व यथायोग्य विचार करण्याची क्षमता प्रदान करो. बस इतकेच.

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top