रूप तुझे तेच अजून
मनांत माझ्या भरलेले
लहान तू होता तरी
रम्यपण भरलेले……….
शब्द होते साधे साधे
अपार त्यात गोडवा रे
विसरणार कसे ते
मनांत ते कोरलेले……….
मोठा जरी झाला असशील
फरक त्याने पडतो काय
आतल्या आत मनांत माझ्या
तू तसाच आहे आंत……….
आठवताच अवचित असा
आतमध्ये होते कांही
अंतर जरी खूप असले
तरी मन थोडेच दूर जाई…….
भिंती साऱ्या माझ्या मनाच्या
रंगांनी साऱ्या भरल्या आहेत
रंग सारे तुझेच तर
सगळीकडे पसरले आहेत…….
(c)मुकुंद भालेराव
संभाजी नगर
दिनांक: २५ जून २०२३
सकाळी: ०८:५९