
अभिराम तुझ्या डोळ्यांमध्ये
जादू कशी झाली,
पाहता पाहता तूझ्यामध्ये
मीच तिथे आली…..
जादू कशी झाली अशी
हरी तिथे आला,
मुरली त्याच्या ओठांवरती
हसरा चेहरा झाला…….
‘आई’ ऐकू आले मला
पण तू तर तिथे नव्हता,
चतुर्भुज यशोदेचा
आत्मज तिथे आला….
‘अभिराम’ अशी साद देता
‘ब़ोल आई’ आले,
तू मात्र दिसला नाही
पण शब्द तुझे आले……
कुठे गेला विचार आला
शोधत होते तुला,
कळलेच नाही असा कसा
विष्णूरुप झाला…….
© मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
०८-०७-२०२३
सकाळ: ०४:४९