आज मनात माझ्या
कवितेचा बहार आहे,
चित्तवृत्ती सार्या माझ्या
फुलून सुंदर झाल्या आहे……
तसे पाहता खरे तर
कारण तसे खास नाही,
एक अंश प्रेमाचा
उमलून फुलून आला आहे…..
जिद्द त्याची अलौकिक
निश्चय त्याचा पक्का आहे
जायचे कुठे आहे त्याला,
त्याचे त्याला माहित आहे……..
तेच तेच काय बोलायचे
अस कांही नाही आहे,
पण मनामध्ये माझ्या
प्रेम माया अपार आहे……
सुकन्या जितकी गोड होती,
प्रपौत्र तितकाच छान आहे,
दशोदिशात आनंदाच्या
लहरी सार्या विहरत आहे…………
उर्जा माझ्या मनातली
भरून खूप उरली आहे,
उर्जा त्याला देता आली,
कित्ती छान होणार आहे…….
अजून असे तंत्रज्ञान,
विकसित कुणी केले नाही,
विकसित तू केल्यावाचून
खचितच तू थांबणार नाही………
मला भविष्य स्पष्ट दिसते,
शोध तू लावणार आहेस,
मनाच्या वेगाने तू,
उर्जा संक्रमित करणार आहेस………..
© मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
१६ जुलाई २०२३
सकाळी: ०९:४१