बस फक्त एकदा तू
माझ्याकडे पाहून घे,
जसे पूर्वी पाहिले तसेच
आज पुन्हा पाहून घे………..
नसेल कांही नवीन आज
म्हणून त्याने बिघडेल काय,
प्रेम व्यक्त करणे काय
सणावारी असते काय,
म्हणूनच म्हणतो बस तुला
पुन्हा एकदा तसेच मला
आज तु पाहून घे……..
तेव्हा तू पाहिले होतेस
तेंव्हाच सारे ठरून गेले,
आता देखील तसेच व्हावे
असेच मला वाटते आहे,
म्हणूनच म्हणतो बस तुला
पुन्हा एकदा तसेच मला
आज तु पाहून घे……..
वर्ष किती झाले तरी
भावना अजून तीच आहे,
जितके प्रेम तेव्हा होते
तितकेच प्रेम आता आहे,
गरजच नाही पुन्हा
आणाभाका करायाची,
म्हणूनच म्हणतो बस तुला
पुन्हा एकदा तसेच मला
आज तु पाहून घे……..
लग्ना आधी लग्नवेळी
जशी छान तू वाट्त होती,
आता देखील तशीच मला
छान तू वाटत आहे,
म्हणूनच म्हणतो बस तुला
पुन्हा एकदा तसेच मला
आज तु पाहून घे……..
विशेष काही नव्हते तेव्हा
आज देखील विशेष नाही,
तेंव्हा देखील कळले नाही
आज देखील माहीत नाही,
म्हणूनच म्हणतो बस तुला
पुन्हा एकदा तसेच मला
आज तु पाहून घे……..
अजूनही मला कळत नाही
काय तुझ्यात वेगळे आहे,
डोळ्यांमध्ये प्रिती तशीच
भरून आज उरली आहे,
म्हणूनच म्हणतो बस तुला
पुन्हा एकदा तसेच मला
आज तु पाहून घे……..
इच्छा झाली आज इतकेच
वाटेल थोडे वेगळे असेल,
परंतु वेगळे काहीच नाही
मनात आले बस इतकेच आहे,
म्हणूनच म्हणतो बस तुला
पुन्हा एकदा तसेच मला
आज तु पाहून घे……..
मान थोडी किंचित तिरपी
थोडी तशीच राहू दे,
उडतात केस स्वच्छंदपणे
त्यांना तसे उडू दे,
देवाने जे जे दिले जसे
सौदर्य खरे तेच आहे,
म्हणूनच म्हणतो बस तुला
पुन्हा एकदा तसेच मला
आज तु पाहून घे……..
डोळे मात्र तुझे तसेच
रोखून तसे राहू दे,
विसर थोडा पडेल जगाचा
बिघडायचे ते बिघडू दे,
वाटेल वेगळे वय म्हणून
पण असे कांही नसते खरे,
म्हणूनच म्हणतो बस तुला
पुन्हा एकदा तसेच मला
आज तु पाहून घे……..
© मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
२७ जुलाई २०२३
सकाळ: ११:५४ / दुपार: १५:१२