चांदण्यांची आरास ऐशी
नयनात तुझीया रंगली,
तारकांची मुक्त नृत्ये
विलसती मुखमंजीरी…..
कुसुमेच सारी बरसती
माधुर्य अमृताचे असे,
बेधुंद बंदिशी त्या तशा
मोहवीती मन स्नेहारवे…….
शांत राती गगन मार्गी
धवल निर्झर वाटतो,
रुप त्यांचे शुभ्रांकीत ते
रूप तूझीये साहतो……….
चंद्रमाही कवतूके तो
पाहतो तव नयनासही,
दिव्य दिसतो मंद्र तेथे
तो ही तूझ्या नयनातही……….
लेवुनी तव रम्य तेजा
रजनीकांता मोहवी,
रातराणी मंद गंधी
निशा अशी मनमोहीनी………
धुंद गंधाचा मनोहर
यमन वर्षे महीवरी,
रेणूरेणू मम मानसी
चित्तात तू अन् अंतरी………
© मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
आक्टोबर ५, २०२३
रात्री: २३:५४