ती दूर तिकडे पलीकडे,
सह्याद्रीच्या पार पुढे,
घाटावरती लांब लांब ती,
निवसते ती शांतपणे……………
माया आणि प्रेम अपार,
हृदयामध्ये ओढ अपार,
शब्दांमध्ये वर्णू कैसे,
प्रेम तिचे ते असे अपार………
जन्म दिवस हा आनंदी,
अशीच राहो स्वानंदी,
लाभो तिजला भाग्य असे,
अन पती-पुत्राचे प्रेम तसे………..
सस्मित राहो अविरत ऐशी,
भाग्य तळपु दे निशीदिनी,
अमाप लाभो आशिर्वचने,
परमेशाची सर्वदिनी…………
जस्मिन आमुची भाग्याची,
सुगंध दरवळे सर्व दिशी,
मनामनातील स्नेह भावना,
यथा पसरवी कस्तुरीशी……….
बरसत राहो सुख समृद्धी,
खंड पडू नये भाग्यात,
ईश कृपेची व्हावी वर्षा,
जस्मिन लाभो सौभाग्य………..
© मुकुंद भालेराव
फोंडा, गोये
दिनांक: १४ ऑक्टोबर २०२३
रात्रौ: २२:४७