हे सत्यवचन बोलले आपण
शंका नसे मानसी निश्चित,
गिर्वाण भारती अभिमानी
ज्ञानियांचे वचनांचे दीप सारे……..
भगवद् कृपा जाहली
ज्ञानाची भागीरथी पसरली,
ज्ञानराजे मराठी बोली
अवलंबिली आम्हा कारणे………..
भावार्थदीपिका ग्रंथू ऐसा
ज्ञानाचा परम प्रकाशू,
आत्मविद्येचा ऐसा मंत्रू
आम्हा दिला ज्ञानराजे………
काय त्यासी वर्णावे
आम्ही बापूडे सारे,
शब्दांचे फक्त बुडबुडे
फुटती ऐसे…………
वंदुनी माउली ज्ञानराया
आणि परम प्रकाशा,
जगद्प्रतीपाळू गणेशा
आत्मचिंतन घडो आम्हा……….
आणखी काय वर्णावी
अमृत वचनांची गोडी,
आम्हा कारणे तयांनी
सारीच वाढली मावंदे…………..
उठा उठा हो सकळीक
इच्छा धरा मनाशी प्रबळ
ईच्छा वाचण्या जगण्याची
आत्मविद्या ज्ञानेश्वरी……….
© मुकुंद: भालेराव
फोंडा -गोंये
दिनांक: ५ नोव्हेंबर २०२४, रविवार
वेळ: सकाळ: ०९:०९