आजच्या काळात ‘पुढे जाणे’ हाच केवळ एक महामंत्र मुले आठव्या, नवव्या वर्गात पोहचली कि, घराघरात उच्चारणे सुरु होते. त्याच बरोबर जेईई, जेईई अडवांस, बित्स्याट अशा विविध परीक्षांची चर्चा सुरु होते आणि ते सहाजिकच आहे म्हणा. ते सर्वस्वी चूक आहे असे माझे मुळीच म्हणणे नाही, परंतु प्रश्न असा आहे कि, ‘पुढे जाणे” म्हणजें काय हे परिभाषेत […]
Month: December 2023
यद्ददाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जन: |
Yogeshvar Krishna in BhagwadgeetaWalk to talk! I am aware that almost everybody on this platform must have learnt in the institute leading to enviable degrees and accolades, and in it you must have learnt a lot on “Leadership” too. Some of you, who are now engaged in training people or are facilitating different corporates and […]
Wow! I am so Beautiful!
Today when I peeped into mirror I saw my new appearance, Never ever I saw this My newer version……….. Even my mirror is old And the place is old I wonder still how I saw my new version in it………. I question myself What this new has happened ! Everything is old and Still how […]
संजीवनसमाधी….थांबला गभस्ती
कार्तिकी कृष्ण त्रयोदशी, माध्यानीचे काळी, आळंदी ग्रामी झाली मांदियाळी संतांची…… . युगाचा भास्कर, अस्तासी जाण्याचा उगवला तो दिवस, त्रयोदशी…….. इंद्रायणी मातेला, करुनी नमन केले स्नान सचैल, ज्ञानदेवे………. तुलशीहार गळा, कपाळी तो गंध झाले ज्ञानदेव, सिद्ध आता……… घेउनी मग दर्शन, तैसे सिद्धेश्वराचे वंदिले तेणे चरण , गुरु निवृत्तीनाथा……… वायुमंडल निस्तब्ध, थांबला गभस्ती, सोपान मुक्ताबाई, फोडती टाहो………. […]
सौंदर्याची परिभाषा
आज असा मी आरसा बघतां दिसले मजला रूप नवे, कधी न पाहिले यापूर्वी मी ऐसे माझे रूप नवे………… जुनाच आरसा दीप जुनाही जागा तैसी बसण्याची, तरीही मला मग रूप नवे ते कैसे दिसले त्यामधुनी………. प्रश्न विचारी मीच मला मग काय जाहले नवे असे, जुनेच सारे तसे असुनी रूप नवे हे कसे दिसे…………. विचार करता सूक्ष्मपणे […]
भगवदगीता, पातंजलयोगसूत्रे आणि मी
मायेच्या बंधनात मी मोहाच्या प्रेमरूपात मी, चित्त मना मुक्त कसे करू कसे न ज्ञात ते……….. योगमार्ग कठीण दिसे ध्यानमार्ग सुलभ तो, परि कसे करू मी ध्यान चित्त शांत न होतसे……………. बुद्धीला न सावरे मन: अश्व हा नावरे, अनंत विषय सर्प जसे क्षणोक्षणी दंश तसे……………. चित्त वृत्ती निरोध हवा जाणतो परि मला, मार्ग न दिसे असा […]
हिरव्या वनाचा ऋतु सोहळा
दिसली वनासी अशी पाठमोरी दरीच्या किनारी वृक्षातळी……….. पुढे पर्वतांची गुढ्या तोरणे अन हिरव्या वनाचा ऋतु सोहळा……….. नसे माणसांचा कुठ गलबला अन उभी शांत तेथे जशी वल्लरी…….. कलल्या प्रकाशी फुले ताम्र तेथे तुझ्या वल्कलांची किमया अशी………… नयनात स्मिता असे लेउनी तू कुणा शोधासी तू वनी सुंदरी………… बरवे असे ते आसमंत सारे करशी कुणाची आराधना………. © मुकुंद […]
हर्ष तोच मानसी…
वाटले पुन्हा पुन्हा जायचे हिमगिरी, हिमस्पर्श मधुर असा हर्ष तोच मानसी…………. दूर हिमाचली तिथे प्रसन्न चित्त व्हावया, विसरण्या नित्य नव्या अनंत त्या विवंचना……….. खचित योगी मी नसे संत वा महंतही, क्षणात जावया तिथे योगमार्गी मी नसे……… विदेह रूपी व्हावयास पुण्यकर्म खूप ते, मिळविले नसे असे अरूप व्हावयास ते………… जाणतो मी तरीही असे कदा न व्हायचे, […]
सिल्क्याराच्या गुहेतून…..
डोक्यावरती पहाड मोठा कोसळला तो समोर डोंगर, जावे कुठे कांही कळेना पाताळाचे महान संकट……… सूर्याचा प्रकाश हरवला दीपावलीचे विझले दिवे, मनामध्ये तरीही आमुच्या आशेचे ते उंच मनोरे……….. केदाराच्या विष्णुरूपाला वंदन करुनी क्षणात आम्ही, महेशाच्या बद्रीविशाला नतमस्तक ती आमची वाणी…….. अनंत जीवा दर्शन घडण्या दर्शन चारी धामाचे, मनुष्य यत्ने कार्य कराया विश्वकार्म्याचे व्रत आमुचे ………… सद्कार्याला […]
शोधण्या मतितार्थ
ऐकता व्याख्यान | हरवले मन | गेले दूर निघून | असे तेंव्हा ||१|| आत्म्याचा विचार | ब्रम्हाचे स्वरूप | निरुपण करती | आचार्य ते ||२|| घडला प्रमाद | उडाले ते लक्ष | शोधण्या मतितार्थ | निरुपणाचा ||३|| © मुकुंद भालेराव पोंडा – गोंये दिनांक: २६-११-२०२३ वेळ: सकाळ: ०९:००
वसंत फुलव राजसा
तुझ्याविना मला सख्या वाटते उणे उणे, तूच सांग रे मला काय मी करू कसे……….. तूच ओढ लाविली प्रीत फुलविली अशी, क्षणात विसरू हे कसे तूच सांग मज सखी………. कधी न वाटले मला फुलेल प्रीत ही अशी, आताच यमन गायला आताच थांबू रे कशी……… विलंबित शांत चित्त चंद्रकंस ख्याल ही, आलाप आर्त आळविता स्मरण तुझेच अंतरी………. […]
रंग वेगळे तुझे असे……
राहू देत मोकळेच केस सखे आज तुझे, नजरेस त्यात पाहू दे रंग वेगळे असे…………. कुंतलात स्मित तुझे नजर तुझी लाजरी, शब्दमुक्त भाव तुझे विहरू दे हृदयांतरी……… मूक शब्द होऊ दे नजर शब्द होऊ दे, न बोलताच शब्दही सर्व मला उमजू दे…………. वायुलाही ना कळो भाव तुझ्या मनातला, भावगंध दरवळो नजरेतुनी हृदयातला……….. शब्द वाक्य कांहीही आता […]
प्राप्त तुला हो यश किर्ती बल
उत्तरेतल्या हिमसाक्षीने गंगा यमुना नदी तिरावरी, सुबक असे ते ग्राम आगळे रुरकी ते तर शांत निराळे…… परिसर त्याचा नयन मनोहर विशाल सुंदर वृक्ष सरोवर, रेखीव ऐसा पदपथ तेथे निवास तेथे किती मनोहर……. विद्यार्जन ते करण्यासाठी घरा सोडुनी दूर प्रदेशी, ऋषी कुलासम भव्य वनाशी निवास जयचा त्या ग्रामाशी……. पंच मास तो शिक्षा घेऊनी अवकाशाला प्राप्त करुनी, […]
तू विरक्त हो अशी
विसरु दे मलाच सर्व, तू विरक्त हो अशी, गुंतवु नकोस व्यर्थ, भावना तूझी अशी……….. उगाच गुंतता सखे, कठीण सर्व होतसे, भावबंध तोडणे, वेदनाच होतसे ………….. कशास गुंततेस तू, थांब तिथे दूरवरी, मोह नको प्रितीचा, करास घेउ नको करी………….. © मुकुंद भालेराव पोंडा – गोंये दिनांक: २८ नोव्हेंबर २०२३ वेळ: ००:१०