विसरु दे मलाच सर्व,
तू विरक्त हो अशी,
गुंतवु नकोस व्यर्थ,
भावना तूझी अशी………..
उगाच गुंतता सखे,
कठीण सर्व होतसे,
भावबंध तोडणे,
वेदनाच होतसे …………..
कशास गुंततेस तू,
थांब तिथे दूरवरी,
मोह नको प्रितीचा,
करास घेउ नको करी…………..
© मुकुंद भालेराव
पोंडा – गोंये
दिनांक: २८ नोव्हेंबर २०२३
वेळ: ००:१०