दिसली वनासी
अशी पाठमोरी
दरीच्या किनारी
वृक्षातळी………..
पुढे पर्वतांची
गुढ्या तोरणे अन
हिरव्या वनाचा
ऋतु सोहळा………..
नसे माणसांचा
कुठ गलबला अन
उभी शांत तेथे
जशी वल्लरी……..
कलल्या प्रकाशी
फुले ताम्र तेथे
तुझ्या वल्कलांची
किमया अशी…………
नयनात स्मिता
असे लेउनी तू
कुणा शोधासी तू
वनी सुंदरी…………
बरवे असे ते
आसमंत सारे
करशी कुणाची
आराधना……….
© मुकुंद भालेराव
पोंडा – गोंये
दिनांक: ६ डिसेम्बर २०२३
वेळ: सायंकाळी: २०:४३