मी शून्य झालो
मी धन्य झालो,
विरली सर्व माया
मी मुक्त झालो………
नसे राग लोभ
न इच्छा कशाची,
नसे कामना काही
मिळवावयाची………
आता द्वेष कसला
आणि इर्षा कशाची,
गती शांत झाली
मम सर्वेन्द्रियांची……….
आता नित्य जाणे न
मंदिरी पुजाया
निजांतरी स्थित
हरीसी पुजाया…….
मी भजतो हरीला
सहस्त्रांश निमिषे,
आता शोध कसला
कशाच्या निमित्ते……….
श्रुती आणि स्मृती
तशी वेदोपनिषदे,
धुंडाळली मी सर्व
आत्मार्थ शोधे……..
फिरुनी सप्तलोकी
अन सप्तपाताळीही
वेदांत सत्य सारे
गवसले निजांतरी……
असे नित्य जे ते
आणि जे पवित्र
असे मुक्त ही ते
शिवस्वरूप……….
थांबला शोध माझा
त्या परमेश्वराचा,
स्थिर आत्मरुपी
असे नित्य माझ्या……..
पसरला प्रकाश,
असा आत्मरुपा,
आता मीच कैवल्य
आनंद ब्रम्हस्वरुपा……….
© मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
दिनांक: २१ एप्रिल २०२४
वेळ: १५:११
Also read: Emancipation सिफर