सुचले न कांही मजला रुचले न कांही मजला का वाटले तसे ते कळले मला न तेंव्हा………. रानात वाट गेली वाटेवरी निघालो गेली कुठे ती वाट न कळले तरीही गेलो……….. होते निबिड अरण्य नाही कुठे कवडसा रानात वाकडी ती दिसली न वाट तेंव्हा………… दिसली पलाशपुष्पे त्या गर्द उंच रानी परि दिसला रवि न तेथे भय वाटले […]
Category: Marathi
सौंदर्याच्या शोधात…..
कोण म्हणत सौंदर्य फक्त दिसण्यात असते, नाही, हे पूर्णपणे खरे नाही, दिसण्यात तर असतेच, हे खरे आहे…… पण पाह्णार्याच्या नजरेत असते हे सुद्धा खरे आहे……… फुलातले असो वनातले असो बर्फातले असो सरितेचे असो किंवा तारकांचे असो……. इतकेच काय पण, काव्यातले कथेतले नाटकातले चित्रातले गाण्यातले सतारीतले विणेतले………. चित्रकाराच्या कुंचल्यातले गायकाच्या आलापातले वादकाच्या हरकतीतले वक्त्यांच्या वाणीतले वेदातल्या […]
चिंब होती रात्र तेंव्हा
चिंब होती रात्र तेंव्हा चंद्र नव्हता साक्षीला घनदाट होती रात्र सारी श्वापदांची घनगर्जना…….. कुणीच ते नव्हते तिथे आवाज ही ना ऐकला घनगर्जनाच तितुक्या होत्या तिथे त्या म्हणाया…….. चाललो किती मी तिथे ना उमगले मला ते पावलागणिक दिसल्या जातीच वासुकींच्या……. भय दाटले मम मानसी पायात कंप जाहला झालाच कंठ शुष्क ऐसा आठवे हरी मनाला……. वाचेवारी तयाचे […]
होताच सांजवेळा
झटकू नकोस पाणी केसात थांबलेले रोखू नकोस तुजला, मन लुब्ध जाहलेले……. फसवी किती मनाला, खोटीच ती कहानी, जे स्पर्शले मनाला, का थांबवी तयाशी……… हृद्यात थांबले ना, नयनात अश्रू असती, श्वासातली गतीही, वदते खरी व्यथाही……. होताच सांजवेळा, दिशा फुलुनी आल्या, साऱ्या नभात जैशा, कलिका फुलुनी आल्या……. हसती नभात साऱ्या त्या तारका शशीच्या, नयनात फेर धरती, साऱ्या […]
तरी सांगून सर्व गेली
अमेरिकेच्या पश्चिमभागी, प्रशांत सागर असे मनोहर, हवाई बेटे निळीजांभळी, स्वप्नसरीसे असती सुंदर…….. ओळख झाली अशी अचानक, काव्य वाचले आंतरजाली, कसे मलाही ना कळले ते, कळले तिजला अंतर्यामी…….. एक दिवस ती अशी अचानक, अवतरली मम स्वप्नपुरी, पूर्वजन्मीचे नाते स्मरता, धावत आली मम नगरी…….. साध्या आपल्या लालपरीची, गंमत तिजला आवडली, अंतरातल्या ओढीने ती, त्वरे पहुचली स्वप्नपुरी…….. साडी […]
नि:शेष = बाकी शून्य
हिरवी दिसतात सारी शेते, काळी दिसते रानमाती, आकाशातल्या निळ्या नभात, अडकून राहतात सारीच नाती……… जमीन नांगरून तयार आहे, बी-बियाणे भरपूर आहे, वाट केंव्हाची पहात आहे, पाउस कधी पडणार आहे……. पावसाचे नक्षत्र होऊन गेले, जीव कासावीस होत आहे, केंव्हा होईल पेरणी माझी, जीव खालीवर होत आहे……… कर्ज काढून आणले पैसे, फी मुलांची भरली नाही, फटके कपडे […]
|| मना सावरा रे प्रयत्ने करुनी ||
मन म्हणजे मस्तवाल शक्तीपुंज, लक्ष लक्ष रश्मीसारखा तळपणारा, डोळे एकदम दिपवून टाकणारा, अंतर्बाह्य सारे दृश्यमान करणारा……….. पण मी सांगतो तुम्हाला, मन खूप खूप हट्टी आहे, मिरासदारी कांही सोडत नाही, एकदा आले मनात काही कि, मग पिच्छा कांही सोडत नाही………… मन म्हणजे नक्की काय असतं, परिभाषा करणे फार कठीण, लोण्याहून असतो स्पर्श मउ, पण बघा वज्र […]
क्षण आताचा मनसोक्त जगून घ्या……….
संध्येमध्ये लाली असते, विरहाची वेदना असते, बदलाची जाणीव असते, परत येण्याची शाश्वती असते…… एक काळ सरला म्हणून, दु:ख करत बसू नये, येणाऱ्या क्षणाना पाहून, विचार करत बसू नये………. उषेच्या लाली सारखीच, संध्याही न्यारी असते, आपली आपली वेगळी अशी, गहरी एक छटा असते…….. उषा आगमनाचा सतत, संदेश ती आणत असते, आनंदाचे वातावरण ती, क्षणार्धात करत असते………. […]
आनंदयात्री
आलो जरी इथे मी, मन थांबले किनारी, गोमंतका किनारी, दिसती सुरम्य लहरी……… विष्णूस्य एक रूप, परशुरामी प्रगटले, मेरू महापराक्रमाचा, ऋषीरूप धन्य झाले…….. जमदग्नी पितृरूपे, दिधले पराक्रमाला, त्या लाभला जिव्हाळा, माता रेणुकेचा……….. शिवभक्त दृश होता, सर्व भूमि दान केली, कश्यपास अवघी, अवनीच दान केली……. गेला निघुनी तेंव्हा, तो महेंद्र पर्वताशी, केले प्रसन्न वरुणा, दिली भूमी तयाशी…….. […]
मुखे यावे माझ्या नाम निरंतर |
मन आता पुसे | कां रे देवपूजा | अंतरात झोंबाझोंबी | गुढतत्वे ||१|| वाढला गलबला | आता अंतर्यामी | सगळाच गोंधळ | कळेचना ||२|| कैसे शोधू आता | सत्यशुद्ध तत्व | वाट माझी मला | सापडेना ||३|| शास्त्रे तरी किती | शोधावी आणिक | वेद उपनिषदे पुराने | महाथोर ||४|| मी आपुला बापुडा | असा […]
|| तुझ्यावाचून देवा आता करमत नाही ||
तुझ्यावाचुन देवा | आता करमत नाही | लागलासे ध्यास | तुझा जीवा ||१|| म्हणे अंतर्यामी | राहतो तू रे | परी स्पर्श मला | जाणवेना ||२|| मनामध्ये असे | तुझा तो निवास | सांगसी विभूतीयोगा | गीतेमध्ये ||३|| आळवतो मी | तुला असा निरंतर | दिसशी तू मज | सर्वांभूती ||४|| मित्र भ्राता भगिनी | […]
लोकशाहीतला तमाशा
येताच कल्पना चौकशीची, आठवे जंतरमंतर तात्काळ, म्हणे आरक्षण सर्व स्त्रियांसाठी, एवढेच एक मागणे असे……… साधले कसे संधान उत्तरेशी, न कळे मंत्र गुप्त यांचे, मांजरास वाटे मिटले हे डोळे, कुणास कैसे कळेल हे…….. पैशाची भाषा असे जोरदार, उघडते दार कोणतेही, हिंदीचा तो द्वेष अन्यथा करती, परि स्वार्थापायी गळाभेट…… विसरती सारे वैरभाव आपुले, शोधती लसावी लोभ करण्या, […]
हस्तस्पर्श तो जादूचा
दूर पर्वती अंधाराचे कृष्ण वलयं दाट तिथे मिनमिनता तो एकच होता दिवा सानुला असे तिथे…….. पहाट झाली रवी उदेला सर्व पसरला प्रकाश तो छोट्याशा त्या गुफेमाजी एक अवलिया निश्चिल तो…….. भगवे त्याचे उत्तरीय ते, वस्त्रे ती ही कषाय ती, कृष दिसें तो असा तपस्वी, दिव्य प्रभावी काया ती……….. लहानशा त्या गुन्फेमाजी, काहीच नव्हते असे तिथे, […]
उंच डोंगरातअसे सुंदरसे घरअसे
उंच डोंगरात असे, सुंदरसे घर असे, आकाश स्पर्शते जणू, वाटते घर जसे…….. सरळ उभा घाट जणू, चढणाची वाट असे, वाहने कशीबशी, चालती वाट तिथे…………. द्विचक्रिका धावतसे, वेगाचे वेड जसे, सुसाट धावती मुले, वार्याधची वरात जसे………… क्षणात भासते असे, सुहृद हस्त पसरवितो, हस्तांदोलन करावयास जणू, विनम्र अग्रे वाकतो……….. वाट अशी थाट असा, फोंड्याचा घाट जसा, नटखट […]
हीच असे खास बात……….
बस आता राहिले आहे, फक्त चोवीस तास, गोव्याला पोहचायला, हीच असे खास बात………. महीने किती गेले उलटून, विचार नुसता करत होतो, असे जाऊ तसे जाऊ, योजना नुसत्या आखत होतो……….. शेवटी आता एकदाचा, सापडला बरं मुहूर्त, चतुश्चाकीने जाण्याचा, करत आहे प्रयत्न………… लांब लांब रस्ते अन, मोकळे मोकळे आकाश, भुरभुर वाहे वारा अन, छान छान आहे प्रकाश………… […]
जणू चांदण्यांचा फुलला पिसारा
उभी ती तिथे त्या दरीच्या किनारी, तशी वाकलेली न्याहाळीत खाली, उगवत्या रवीचा पसरे प्रकाश, फुलवीत होता तिच्या मनास……………. तिथे कोकिळेचे असे मुग्ध गान, तिचे चित्त हर्षे हरवीत भान, काळ्या ढगांची श्वेतरंगी किनारी, हसर्या जलाची बरसात सारी…………. मनी दु:ख सारे जसे ते निखारे, किती घोर शंका अन ते शहारे, प्रतिमा प्रियाच्या अशा त्या मनात, अनामिका ती […]
नशीब म्हणजे काय असतं हो !
सकाळच्या कोवळ्या उन्हाची सुखावणारी ऊब असते, निरभ्र आकाशात अचानक दिसणारी एकसाथ उडणारी पक्षांची रांग असते, निरागसपणे हसणार्या सोनुल्यांची गम्मत असते, खूप दिवसांनी अचानक पाठीवर पडणारी मित्राची थाप असते, अवचित चेहर्यावर थिरकणार्या जलबिन्दुची बहार असते, रेडिओ लावावा अन् पन्नासच्या शतकातील गोड जुनी गाणी लागावी, प्रेमळ ताईचा दूरच्या गावावरून फोनवर ‘दादा कसा आहेस?’ असा प्रश्न यावा, अर्धंगीनीने […]
आनंदाची फुले बहरली
विशाल मोठ्या सागरात ते, एकच गलबत डोलत होते, प्रतिबिंब असे लाटांमध्ये, धवल शीड ते चमकत होते…………………. तिथे बहादुर एक नावाडी, गलबत एकटे हाकत होता, उफाळणार्याह सागराचे संगीत कानात साठवत होता………….. खळाळणार्याह लाटांबरोबर, उच्च रवाने तो गात होता, जोरात वारा घोंगावत होता, पाण्याचा शिडकाव होत होता……….. तितक्यात एक गलबत दिसते, हात कुणी तरी दाखवीत होते, पुसटशी […]
दे सदबुद्धी त्यांना | आता तरी ||
कुणी एक कन्या | झाली ती जागृत | केले कांही वक्तव्य | नकळत || १ || तिचे नव्हे ते खचित | दुसरे कुणाचे | होते कांही शब्द | भयंकर || २ || वापरली तिने | सर्व सर्वनामे | विशेष नावांचे व्यर्थची | कावले || ३ || मनी तिच्या नव्हते | भयंकर कांही | सामाजिक चीड […]
आनंदी व्हायला कारण कशाला असावे लागते
आनंदी व्हायला कारण कशाला असावे लागते, जमिनीवरून झेपावयाला कारण कशाला असावे लागते……. नवीन कांही शिकायला कारण कशाला असावे लागते, आकर्षक सुंदर दिसायला कारण कशाला असावे लागते………… सहजपणे ‘धन्यवाद’ म्हणायला मन मोकळे असावे लागते, नसली चूक तरीही ‘क्षमस्व’ म्हणायला मन मोठे असावे लागते….. रुसून कुणी बसेल तेंव्हा स्वत:हून बोलायला लागते, आनंद कशातही शोधायला मन आनंदी असावे […]