निळ्या नभा पसरले हे श्वेत अभ्र सारे, हिरव्या धरेवरी ते हे गालीचे तृणाचे……. त्या सानुल्या घरात किती रम्य लोक असती, जगणे किती निराळे किती भाग्यवान असती…… वन बाजुला चहूकडे मैत्री जणु युगान्ची, स्मित नित्य बघुनी त्यान्चे आनन्द मनी उभवती…. किरणे अशी रवीची उल्हास नित्य देती, जावे तिथे रहाया स्पृहा असे मनासी…… तो उंच वृक्ष तिथे […]
Category: Marathi
रस भक्तीचा रे मना
जाहलो विमनस्क मी ओघळले जणू मणी, माळ जशी खंडता गोंधळ माझ्या मनी……….. दर्शने मी वाचली वेद पुराणे ही तशी, यत्न केला जाणण्याचा नित्य आणि अनित्यही………. समजले उमजले वाटले असे मला, ओरणतू आज उमगले कांही च ना कळले मला……… ब्रम्ह सत्य ही खरे नाशिवंत चराचरी, शिणवावी किती अशी माझीच मी वैखरी………. अनित्य असे लिंगदेह आशाश्वत त्यांचे […]
आषाढस्य प्रथम दिवसे
पाहता नभाकडे शाम सखा बरसला, क्षणात प्रेमस्वरूप तो वर्षातून प्रगटला.. दिशा दिशा उमलल्या तेज पसरले असे, सुवर्ण रश्मि धावले मन प्रसन्न जाहले.. क्षणोक्षणी नभामधे अनंत रंग उमलती, थेंब थेंब दरवळत मनी फुले उमलती.. घननीळा शाम सखा स्नेहरूप पाहतो, धरेस भेटण्यास तो सतत असा धावतो .. थंड वारे वाहती रिमझिम मंद गीत ते, स्वर्गसुख असे क्षणात […]
|| विवाहसूक्त ||
हातात हात घेता जुळली मने क्षणांत, गुंफून त्या करांना मी घेतले हातात…… शास्त्रार्थ सत्य असतो रूढी परंपराही, अवचित गवसतो तो मग अर्थ जो प्रवाही…. विवाह बंधनाचा ऋतु अर्थ सत्य वाही, संस्कार जीवनाचा करतो तसा प्रवाही…. मांगल्य त्या ऋतूंचे तो सोहळा जनांचा करतो प्रगट ईशाचा संकल्प तो तयाचा…. ती शास्त्र-सूक्त वचने ऋचा तशा समर्थ ते अर्थगर्भ […]
आज मी नव्यांकुरे
पुन्हा एक प्रसन्न प्रभात एक नवा सूर्य प्रकाश, आयुष्यात रंग नवे नवे पुन्हा ऋतु मनात…. स्थित्यंतरे दश वर्षी पाहिली मी पदोपदी, वेगळ्याच अनुभूति हर्षोल्लीत आशा स्मृती.. कन्या मी जाहली जाया नव्या नव्या जीवनी, पट उघडत सारखे गांधाळले मम मनी.. महद्भाग्य दिनी असे मातृत्व लाभले मला, परमोच्च हर्ष मानसी आनंद ऐसा जाहला…. आज मी नव्यांकुरे प्रफुल्ल […]
वाङ्गनिश्चय
तोच आज दिवस असे त्रयोदश वर्ष नंतरम्, प्रक्षाळिले तव पदा पुत्रवधु स्विकारण्या…. शुभदीन तोच आज नूतन नाते फुलविले, विचार सर्व करुनिया निश्चयास पोहचलो…. पूर्व संचित सारखे बनविते सुभाग्य असे, जन्मोजन्मी लाभते पुर्वपुण्य फल असे.. अजून मानसी असे सुखद भाव सारीखे, उत्फुल्ल वाटते मनी तरल भाव सरस असे…. सुरम्य निमिष पावले पदचिन्ह गृहा देखिले, मांगल्य अवतरत […]
कठोपनिषद
परमात्मा-जीवात्मा, वसती हृदयी गुहेत, आस्वाद घेती ते, परम सत्य फलाचे विद्वान म्हणती तयाला, किती हे विचित्र परी सत्य आहे, हे महत तत्व सारे……. देहा नियंत्रित मन-बुद्धि करते, असती छाया स्वरूप उभय अन्यत्व ते, पशू धावतो तो, मणी मानवाच्या, जयाच्या मनी नाच चाले कामनेचा…….. बहिर्मुख होती जे असे ते पुरुष, ते भोगती ते शरीर दु:खे अनेक, […]
उमलते मनासी नवे काव्य ऐसे
तुझी नम्रतेची मोहिनी अजुनी रमते मनासी अशी निशीदिनी, मोहक आभा ती नयनात प्रीति वेडावते मज ती आनन्दकारी……. न भेटलो कधीही न स्पर्शले तनुस परि श्वासात तुझ्या असे धुंद कैफ, मनी रम्य किती सुकुमार रूपे परि सर्व विरती तुझ्या रूपात..…… श्रुतींचे मनसोक्त ऐसे तराणे आलाप घेता अन हरकतींचे, उमले मनासी नवे काव्य तेंव्हा जणु मध्यरात्री चंन्द्रकंस […]
जानेकी इतनी जल्दी क्यों….
ख्वाबमे आती नही आनेपर रुकती नही, आनेको देरी करती हो जानेकी इतनी जल्दी क्यों……… मैखानेमे जाता नही हुं न साकी कि जरुरत है, बस तेरी याद ही काफी है तनहाईमें खुदको संभलनेके लिये……….. अजीब है दास्तां ऐसी ए क्या बयां करू इसे मे, सब कुछ लगता है अपनासा मगर हर मुकाम है खंडहर…….. अब जाने […]
फ्राईडचे कृष्णविवर आणि पातंजलींची प्रकाशगंगा
मनाच्या तळाशी, असे डोह काळा, तिथे वासनांचाच, सारा पसारा……… अतृप्त ईच्छा, अमूर्त वासनांचे, पोळे तिथे ते, असे दंश त्यांचे……….. भडकती ज्वाला, तिथे काम अग्नि, कधी शांत ना तो, शमन होत नाही……… नियंत्रित त्याला, करण्या सुयोग्य, असे एक प्रौढ, विच्चारी प्रबुद्ध………….. तरी संघर्ष सारा, असे चाललेला, ‘करण्या न करण्या’, असे कृत्य व्हाया……… अस्तित्व तेथे, असे नित्य […]
स्थितप्रज्ञस्य का भाषा?
मी शून्य झालो मी धन्य झालो, विरली सर्व माया मी मुक्त झालो……… नसे राग लोभ न इच्छा कशाची, नसे कामना काही मिळवावयाची……… आता द्वेष कसला आणि इर्षा कशाची, गती शांत झाली मम सर्वेन्द्रियांची………. आता नित्य जाणे न मंदिरी पुजाया निजांतरी स्थित हरीसी पुजाया……. मी भजतो हरीला सहस्त्रांश निमिषे, आता शोध कसला कशाच्या निमित्ते………. श्रुती आणि […]
मनोरहस्य
अचेतन मनांत आंत भिती असे मनांत फार, विध्वंसक युद्ध सुरु असे उन्मत्त विचार अनंत आंत……… अवास्तव वासना किती प्रबळ मनांत ही तिथे, हैदोस रात्रंदिन तयांचा विक्राळ असे रूप दिसे……… अनैतिक वासनांचेच ते प्रचंड तांडव ही तिथे, अवास्तव इच्छांचे अपार अफाट प्रेमही तिथे……… स्वार्थी गरजांचे अमाप थैमान अथक चालते, निर्लज्ज अनुभवांचे कृष्णकृत्य ही तिथे…….. मदांध असे […]
संजीवनसमाधी….थांबला गभस्ती
कार्तिकी कृष्ण त्रयोदशी, माध्यानीचे काळी, आळंदी ग्रामी झाली मांदियाळी संतांची…… . युगाचा भास्कर, अस्तासी जाण्याचा उगवला तो दिवस, त्रयोदशी…….. इंद्रायणी मातेला, करुनी नमन केले स्नान सचैल, ज्ञानदेवे………. तुलशीहार गळा, कपाळी तो गंध झाले ज्ञानदेव, सिद्ध आता……… घेउनी मग दर्शन, तैसे सिद्धेश्वराचे वंदिले तेणे चरण , गुरु निवृत्तीनाथा……… वायुमंडल निस्तब्ध, थांबला गभस्ती, सोपान मुक्ताबाई, फोडती टाहो………. […]
सौंदर्याची परिभाषा
आज असा मी आरसा बघतां दिसले मजला रूप नवे, कधी न पाहिले यापूर्वी मी ऐसे माझे रूप नवे………… जुनाच आरसा दीप जुनाही जागा तैसी बसण्याची, तरीही मला मग रूप नवे ते कैसे दिसले त्यामधुनी………. प्रश्न विचारी मीच मला मग काय जाहले नवे असे, जुनेच सारे तसे असुनी रूप नवे हे कसे दिसे…………. विचार करता सूक्ष्मपणे […]
भगवदगीता, पातंजलयोगसूत्रे आणि मी
मायेच्या बंधनात मी मोहाच्या प्रेमरूपात मी, चित्त मना मुक्त कसे करू कसे न ज्ञात ते……….. योगमार्ग कठीण दिसे ध्यानमार्ग सुलभ तो, परि कसे करू मी ध्यान चित्त शांत न होतसे……………. बुद्धीला न सावरे मन: अश्व हा नावरे, अनंत विषय सर्प जसे क्षणोक्षणी दंश तसे……………. चित्त वृत्ती निरोध हवा जाणतो परि मला, मार्ग न दिसे असा […]
हिरव्या वनाचा ऋतु सोहळा
दिसली वनासी अशी पाठमोरी दरीच्या किनारी वृक्षातळी……….. पुढे पर्वतांची गुढ्या तोरणे अन हिरव्या वनाचा ऋतु सोहळा……….. नसे माणसांचा कुठ गलबला अन उभी शांत तेथे जशी वल्लरी…….. कलल्या प्रकाशी फुले ताम्र तेथे तुझ्या वल्कलांची किमया अशी………… नयनात स्मिता असे लेउनी तू कुणा शोधासी तू वनी सुंदरी………… बरवे असे ते आसमंत सारे करशी कुणाची आराधना………. © मुकुंद […]
हर्ष तोच मानसी…
वाटले पुन्हा पुन्हा जायचे हिमगिरी, हिमस्पर्श मधुर असा हर्ष तोच मानसी…………. दूर हिमाचली तिथे प्रसन्न चित्त व्हावया, विसरण्या नित्य नव्या अनंत त्या विवंचना……….. खचित योगी मी नसे संत वा महंतही, क्षणात जावया तिथे योगमार्गी मी नसे……… विदेह रूपी व्हावयास पुण्यकर्म खूप ते, मिळविले नसे असे अरूप व्हावयास ते………… जाणतो मी तरीही असे कदा न व्हायचे, […]
सिल्क्याराच्या गुहेतून…..
डोक्यावरती पहाड मोठा कोसळला तो समोर डोंगर, जावे कुठे कांही कळेना पाताळाचे महान संकट……… सूर्याचा प्रकाश हरवला दीपावलीचे विझले दिवे, मनामध्ये तरीही आमुच्या आशेचे ते उंच मनोरे……….. केदाराच्या विष्णुरूपाला वंदन करुनी क्षणात आम्ही, महेशाच्या बद्रीविशाला नतमस्तक ती आमची वाणी…….. अनंत जीवा दर्शन घडण्या दर्शन चारी धामाचे, मनुष्य यत्ने कार्य कराया विश्वकार्म्याचे व्रत आमुचे ………… सद्कार्याला […]
शोधण्या मतितार्थ
ऐकता व्याख्यान | हरवले मन | गेले दूर निघून | असे तेंव्हा ||१|| आत्म्याचा विचार | ब्रम्हाचे स्वरूप | निरुपण करती | आचार्य ते ||२|| घडला प्रमाद | उडाले ते लक्ष | शोधण्या मतितार्थ | निरुपणाचा ||३|| © मुकुंद भालेराव पोंडा – गोंये दिनांक: २६-११-२०२३ वेळ: सकाळ: ०९:००
वसंत फुलव राजसा
तुझ्याविना मला सख्या वाटते उणे उणे, तूच सांग रे मला काय मी करू कसे……….. तूच ओढ लाविली प्रीत फुलविली अशी, क्षणात विसरू हे कसे तूच सांग मज सखी………. कधी न वाटले मला फुलेल प्रीत ही अशी, आताच यमन गायला आताच थांबू रे कशी……… विलंबित शांत चित्त चंद्रकंस ख्याल ही, आलाप आर्त आळविता स्मरण तुझेच अंतरी………. […]