पुन्हा बरोबर…..
का स्वत:ला दु:ख देऊ, दूर झाले सारे रस्ते,
परत का आठवू, विसरलेले, मनस्वी जुने रस्ते….
रम्य सार्या आठवणी, दोघांच्या होत्या जरी,
आपलीच फक्त मालकी, वेदना का करून घेऊ………
सुख अनुभवले दोघांनी, दु:खही दोघे घेऊ,
साथ येथेही राहू आपण, मस्त यातही राहून घेउ……….
जरी नाही आता बरोबर, भूतकाळ थोडा आठवून घेऊ,
भविष्य काही असले जरी, वर्तमानात राहून घेऊ……….
दैव आपले देवदत्त, हवे तसे जगून घेऊ,
मात्र कुणाला कसलेही, दु:ख सोडून सारे देऊ……
जीवन सारे सुरेख आहे, गीतात संगीत ऐकून घेऊ,
आपले वेगळे सारे आहे, आपले आपण जगून घेऊ……..
मुकुंद भालेराव
औरंगाबाद / ११-११-२०१७